रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. एका नामांकित खासगी बँकेत कार्यरत असलेला ३३ वर्षीय बँक कर्मचारी पोलिसांच्या नावे चार पानांचे पत्र लिहून अचानक बेपत्ता झाला आहे. संबंधित तरुणाची दुचाकी कोळकेवाडी धरण परिसरात आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, घातपाताची किंवा आत्महत्येची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंद मुरलीधर पालांडे असे या बेपत्ता झालेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव असून तो चिपळूण तालुक्यातील अलोरे गावचा रहिवासी आहे. मुकुंद हा चिपळूण शहरातील काविळतळी परिसरातील एका खासगी बँकेच्या शाखेत कार्यरत होता. शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तो अचानक बँकेतून बेपत्ता झाला. तो रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्याच्या वडिलांनी शिरगाव पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.
पत्रात धक्कादायक खुलासे आणि ४ जणांची नावे:
मुकुंद बेपत्ता होण्यापूर्वी त्याने चिपळूण पोलीस निरीक्षकांना उद्देशून स्वहस्ताक्षरात एक चार पानांचे सविस्तर पत्र लिहून ठेवले आहे. या पत्रात त्याने आपल्याला होत असलेल्या मानसिक त्रासाचा आणि ब्लॅकमेलिंगचा स्पष्ट उल्लेख केला आहे. चिपळूण शहरातील वीरेश्वर तलाव परिसरात आपल्याला चार जणांनी बेदम मारहाण केली होती आणि नंतर ओळखीच्या पोलिसांच्या मध्यस्थीने ते प्रकरण मिटवण्यात आले होते, असा धक्कादायक खुलासा त्याने पत्रात केला आहे. या चार लोकांकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगत मुकुंदने पत्रात त्या चार जणांची नावे स्पष्टपणे नमूद केली आहेत आणि त्यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे.
धरणाजवळ सापडली दुचाकी, शोधमोहीम सुरू:
शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांना मुकुंद पालांडे यांची दुचाकी कोळकेवाडी धरण परिसरात लावारिस अवस्थेत उभी असलेली आढळून आली. त्यामुळे त्याने धरणात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने रात्रीच शोधमोहीम सुरू केली. शनिवारी सकाळपासून पुन्हा एकदा बोटींच्या आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या साहाय्याने कोळकेवाडी धरणाच्या विस्तीर्ण पाण्यात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. चिपळूण पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून पत्रात उल्लेख केलेल्या संशयितांची चौकशी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
शहर
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून ४,७०८ क्युसेक केला; धरणसाखळीत ७८.४९ टक्के पाणीसाठा जमा, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- पुणे: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या दोन बनावट अटेंडंटना मुख्य तिकीट निरीक्षकांनी रंगेहाथ पकडले ; पुणे रेल्वे स्थानकावरील घटना
महाराष्ट्र
- पुणे: राज्यात आरोग्य चिंतेत वाढ: डेंग्यूचे ३,७६२ तर हिवतापाचे २,०३६ रुग्ण नोंदवले, साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू
- ठाणे: किरकोळ कारणावरून लिव्ह-इन पार्टनरच्या ७ वर्षांच्या चिमुरड्याची काठीने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या
- नागपुर: लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करून दोन कुख्यात तस्करांना अटक, साथीदाराचा शोध सुरू
- पुणे: टीईटी परीक्षा घोटाळा हा मागील सरकारच्या काळातलाच सर्वात मोठा स्कॅम, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर जोरदार पलटवार
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: आयपीएस बोलत असल्याचं भासवलं, अटक करण्याची भीती दाखवत ६९ वर्षीय वृद्धेला १२ लाखांनी गंडवलं!
- छत्रपती संभाजीनगर: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला
- पुणे: चेहऱ्यावरील फोडांच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल; चाकण परिसरातील घटनेने परिसरात शोककळा
- छ.संभाजीनगर: प्रसिद्ध 'उत्तम उपहार गृह'वर FDA चा छापा, हॉटेलात पाय टाकताच नको ते दिसलं, परवाना रद्द!
राजकीय
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
- जळगाव: राष्ट्रवादीचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण होणार?
- नवी दिल्ली: जीव देण्याचीही तयारी! दिल्ली पोलिसांच्या हाती लागलेल्या विद्यार्थ्यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय आढळलं?
इतर
- आजचे राशिभविष्य २३ जुलै २०२६: सूर्य-गुरूचा द्विग्रह योग या राशींसाठी ठरणार लकी, गुरु देणार यश, संपत्ती व प्रगती!
- आजचे राशिभविष्य २१ जुलै २०२६: या राशींना मिळणार गुडन्यूज तर या राशींना बसणार मोठा फटका! पहा तुमचे भविष्य
- आजचे राशिभविष्य १९ जुलै २०२६: 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळेल यश!
- आजचे राशिभविष्य १६ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; धनलाभ, यश आणि आनंदाचे संकेत
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: संपत्तीच्या हव्यासापोटी बायकोने पार केली क्रूरतेची सीमा तिसऱ्या पतीला बाथरुममध्ये कोंडून जिवंत जाळल्याची अत्यंत संतापजनक घटना
- उत्तर प्रदेशातील: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीला विषारी सापाकडून विसकावून संपवले; मेरठमधील हत्येचे भयानक सत्य उघड
- दिल्लीतील student protest चे पुणे कनेक्शन! 'कॉकरोच जनता पार्टी'चा शनिवारवाड्यातून आक्रमक मोर्चा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी अन् वाहतुकीत बदल"
- तेलंगणा: खेळता-खेळता मोबाईलची बॅटरी तोंडात धरली अन् झाला भीषण स्फोट; १२ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत



























Subscribe to my channel



