जुन्या दागिन्यांना का नाही योग्य दाम?Image Credit source: गुगल
Gold Price Today: सोन्याच्या किंमती दिवागणिक वाढत आहेत. सोन्याच्या किंमती लवकरच दोन लाखांचा टप्पा ओलांडतील असा दावा करण्यात येत आहे. सध्या सराफा बाजारात सोन्याची चकाकी वाढली आहे. सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिली नाही. मौल्यवान धातूच्या किंमतीत सातत्याने चढउतार दिसत आहे. अशावेळी 5 वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या सोन्याला आज किती किंमत मिळेल? जुन्या दागिन्यांना का मिळत नाहीत योग्य भाव? काय आहे त्यामागील कारण?
भारतात सोने खरेदी करणे ही एक परंपरा आहे. महिला सोने खरेदीला अधिक महत्त्व देतात. सोने खरेदी करणे ही एक मौल्यवान गुंतवणूक मानल्या जाते. कारण गरजेवेळी हे सोने वापरता येते. जर तुम्ही जुने सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या विचारात असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जिथे तुम्ही सोने विक्री करत आहात तो ज्वेलर विश्वासू हवा. सोन्यातील कृत्रिम मोती वा इतर चकाकणारे दगड काढून घेण्यात येतात. सोन्याची दागिने खरेदी करताना या आर्टिफिशिअल माणिक-मोतीची किंमत पण जोडलेली असते. त्यानंतर सराफा सोने वितळून त्याचे मूल्य निश्चित करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, हॉलमार्क असलेले दागिने वितळण्याची गरज नसते. त्यामुळेच हॉलमार्क दागिने खरेदीचा सल्ला दिल्या जातो.
पाच वर्षांत सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ
पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2020 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव भारतात जवळपास 48,000 ते 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव दीड लाखांच्या पुढे आहे. या किंमतींवर नजर टाकली तर पाच वर्षात सोन्याची किंमत तिप्पट झाल्याचे दिसून येते. सोन्याने या पाच वर्षात मोठी झेप घेतल्याने सोन्यातून मोठा परतावा मिळत आहे. पण ज्यांनी ठोक सोने घेतले. बिस्कीट, विट अथवा कॉईन त्यांना त्याचे थेट लाभ होतात. पण सोन्याची दागिने खरेदी करणार्यांना त्याप्रमाणात लाभ मिळत नाही. कारण कॅरेटनुसार प्रत्येक दागिन्यात इतर धातूंचे मिश्रण असते. सोने वितळल्यावर जो गोळा अथवा तुकडा समोर येतो, त्याआधारे मग सोन्याची किंमत देण्यात येते. परिणामी अनेकदा जुन्या दागिन्यांवर ग्राहकांना नेहमी योग्य मोबदला मिळत नसल्याची भावना समोर येते.
मेकिंग चार्ज आणि डिझाईन
जेव्हा सोन्याची दागिने आपण खरेदी करतो, त्यावेळी त्याची डिझाईन, पॅटर्न आणि फॅशन अधिक लक्षात घेतली जाते. त्यानुसार या दागिन्यांची किंमत वाढते. यामध्ये घडणावळ, मेकिंग चार्जेस, डिझाईन, GST, डायमंड, स्टोन वर्क याचाही पैसा मोजावा लागतो. पण ज्यावेळी आपण हा दागिना विक्री करायला जातो. तेव्हा या सर्व वस्तूंचे मूल्य परत मिळत नाही, केवळ वितळून जो तुकडा अथवा सोन्याचा गोळा उरतो, त्याचीच किंमत मिळते. त्यावेळी ग्राहकाला इतर कोणताही खर्च परत मिळत नाही. त्यामुळे अनेकदा जुने दागिने विक्रीवर योग्य किंमत मिळत नसल्याचे ग्राहकांना वाटते.
शहर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली ताप १०२ अंशांवर पोहोचला असून टायफॉइडची लक्षणे, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र
- सांगली: नागपंचमी २०२६ शिराळ्यात होणार ४१ नागांचे जिवंत दर्शन; वन्यजीव विभागाकडून कडक अटी व शर्तींवर परवानगी मंजूर
- पुणे: तुकाराम मुंढेंच्या एफडीए पथकाची मोठी कारवाई; अन्न सुरक्षेचे उल्लंघन व अस्वच्छतेमुळे १६ आस्थापनांचे परवाने निलंबित
- मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या पिलर उभारणीचे काम मध्यरात्री सुरू; आवाजामुळे न्यू दिंडोशीतील रहिवाशांची झोपमोड, नागरिक त्रस्त
- नाशिक: विदर्भ प्रवासाला मोठे बूस्टर नाशिक-बडनेरा मेमूचा 'स्पेशल' टॅग हटला; आता १५ ऑगस्टपासून नियमितपणे दररोज धावणार
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- झारखंड: रांचीमध्ये तिरंगा यात्रेत सहभागी होण्यापासून रोखत पोलीस प्रशासनाकडून धक्काबुक्की; जेएलकेएम नेते देवेंद्र नाथ महतो यांचा गंभीर आरोप
- मध्य प्रदेश: "आता देशासाठी जीव देणार नाही, तर देशद्रोह्यांचा जीव घेऊ"; ८० व्या स्वातंत्र्यदिनी बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे अत्यंत आक्रमक विधान
- जम्मू-काश्मीर: किश्तवाड येथे महिंद्रा स्कॉर्पियो कार अनियंत्रित होऊन चिनाब नदीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू
- गोवा: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा; विकसित गोवा २०३७' चा रोडमॅप जाहीर, रोजगार पायाभूत सुविधा आणि पर्यटनावर विशेष भर


























Subscribe to my channel




