भोपाळ: माजी 'मिस पुणे' आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर त्विशा शर्मा (वय ३३) हिचा लग्नानंतर अवघ्या पाच महिन्यांत संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथील कटारा हिल्स भागातील तिच्या सासरच्या घरात १२ मे रोजी त्विशाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळबळ उडाली असून, त्विशाच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीवर आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत.
लव्ह मॅरेज की छळाचा सापळा?
मूळची उत्तर प्रदेशातील नोएडा येथील राहणारी त्विशा शर्मा आणि भोपाळमधील वकील समर्थ सिंग यांची ओळख २०२४ मध्ये एका डेटिंग ॲपद्वारे झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. लग्नानंतर त्विशा भोपाळला शिफ्ट झाली. मात्र, लग्नाचे सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेल्यानंतर तिला सासरच्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मैत्रिणीसोबतचे चॅट आणि वडिलांचे आरोप:
त्विशाच्या मृत्यूच्या पूर्वसंध्येला तिने आपल्या मैत्रिणीला पाठवलेले मेसेज सोशल मीडियावर समोर आले आहेत. "मी लग्नाच्या जाळ्यात अडकले आहे, तू अशी चूक करू नकोस", "मला इथून घेऊन जा, हे लोक मला जगू देणार नाहीत," अशा शब्दांत तिने आपल्या वेदना मांडल्या होत्या. त्विशाच्या वडिलांनी सांगितले की, मुलीच्या मृत्यूची बातमी मिळताच ते भोपाळला पोहोचले. तिचा मृतदेह पाहिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. तिचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता, असा थेट आरोप वडिलांनी केला आहे.
सासरच्या लोकांचे दावे आणि पोलीस तपास:
त्विशाची सासू, जी एक निवृत्त न्यायाधीश (Retired Judge) आहे, तिने हे आरोप फेटाळून लावले आहेत. जामीन अर्जात त्यांनी असा दावा केला आहे की, त्विशा मानसिक तणावाखाली होती आणि तिला अंमली पदार्थांचे (Drugs) व्यसन होते. मात्र, त्विशाच्या कुटुंबीयांनी हा दावा पूर्णपणे फेटाळला असून दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयात तिचे पुन्हा शवविच्छेदन (Postmortem) करण्याची मागणी केली आहे.
नुकत्याच समोर आलेल्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये त्विशा घटनेच्या दिवशी सकाळी ७:२० वाजता गच्चीकडे एकटीच जाताना दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच तिचे पती समर्थ सिंग आणि इतर काही जण तिला बेशुद्ध अवस्थेत पायऱ्यांवरून खाली आणताना दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पती समर्थ सिंग आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
शहर
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- 'एक राष्ट्र, एक निवडणूक' वर मंथन: १० आणि ११ जुलै रोजी गोव्यात संसदीय समितीची दोन दिवसीय बैठक
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी मोठा निर्णय; अधिवास प्रमाणपत्र होणार बंधनकारक!
- पालखी सोहळ्याचा उत्साह! सुरक्षेसाठी पुण्यातील रस्त्यांवर जड वाहनांना बंदी; वाहतूक व्यवस्थापनाचे कडक निर्बंध
- पावसाची विश्रांती! पूर ओसरणार, नागरिकांना दिलासा, हवामान विभागाचे ताजे अपडेट
- सातारा: २४ तासांत ५१३ मिमी पाऊस; महाबळेश्वरात इतिहासातील विक्रमी वर्षाव
गुन्हा
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- RTO विभागातील भ्रष्टाचाराची SIT द्वारे होणार चौकशी; दोषींवर होणार कठोर कारवाई!
- पुणे: व्हॉट्सॲप चॅटमध्ये गुपिते उघड चॅटमध्ये सिया आणि चेतन यांनी एकमेकांशी केलेल्या 'सिक्रेट लग्ना' बद्दल माहिती
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
- आज ७ जुलै रोजी या राशींवर बरसेल धन, वाचा तुमचे आर्थिक भविष्य
- पावसाळ्यातील फंगल इन्फेक्शनपासून राहा सुरक्षित; त्वचेच्या आरोग्यासाठी 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!
मनोरंजन
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
- 'द इंडिया स्टोरी'चा टीझर रिलीज! श्रेयस तळपदे आणि काजल अग्रवालची जोडी शेतीतील एका गंभीर वास्तवावर प्रकाश टाकणार.
देश विदेश
- भारत-इंग्लंड तिसरा टी२०: टीम इंडियात मोठे बदल; रवी बिश्नोई बाहेर, तर वैभव सूर्यवंशीवर सर्वांचे लक्ष!
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
- क्रूरतेचा कळस! इमारतीवरून ढकलूनही पती वाचला; शेवटी प्रियकराच्या सांगण्यावरून 'कॅन्यूला'मधून दिले टॉयलेट क्लीनरचे इंजेक्शन
- तेलंगणा: प्रियकरासाठी पत्नीने नर्स असूनही सलाईनमध्ये टॉयलेट क्लीनर टाकून नवऱ्याचा केला गेम


























Subscribe to my channel

