पुढील महिन्यात म्हणजेच मार्च मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मात्र या सणाबद्दल लोकांमध्ये बराच गोंधळ निर्माण झालेला आहे. या वर्षी चंद्रग्रहण आणि भद्रा होळीशी जुळत आहेत, ज्यामुळे होळी आणि रंगपंचमी नेमकी कोणत्या तारखेला साजरी करावी असा प्रश्न लोकांना पडलेला आहे. कारण वेगवेगळे धार्मिक केंद्र आणि विद्वान वेगवेगळे मत मांडत आहेत ज्यामुळे होळी कोणत्या दिवशी साजरी केली जाईल याबद्दल लोक गोंधळलेले आहेत.
काही कॅलेंडरनुसार होलिका दहन 2 मार्च 2026 रोजी केले जाईल आणि रंगपंचमी होळी 3 मार्च रोजी साजरी केली जाईल. तर काही काशीतील विद्वानांचा असा विश्वास आहे की होलिका दहन 2 मार्चच्या रात्री होईल, परंतु होळी 4 मार्च रोजी साजरी करावी. या गोंधळाचे मुख्य कारण म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला होणारे पूर्ण चंद्रग्रहण.
ज्योतिषांच्या मते…
प्रसिद्ध ज्योतिषी पंडित सांगतात की 2026 चे पहिले चंद्रग्रहण 3 मार्च रोजी होईल आणि त्याचे परिणाम भारतात स्पष्टपणे दिसून येणार आहे. हा दिवस फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस देखील आहे.
ज्योतिषाच्या मते, पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी करणे पारंपारिक आहे. त्यामुळे 3 मार्च रोजी ग्रहण असल्याने त्या दिवशी होळीचा सण साजरा करावा तेही ग्रहणाची वेळ संपल्यावर होळीची पूजा करता येणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी 4 मार्च 2026 रोजी देशभरात रंगपंचमी म्हणजेच धुळवड साजरी करणे शास्त्रानुसार योग्य असेल.
चंद्र ग्रहणाची योग्य वेळ
३ मार्च रोजी होणारे पूर्ण चंद्रग्रहण दुपारी 3 वाजून 19 मिनिटांनी सुरू होईल ते संध्याकाळी 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत चालेल. हे चंद्रग्रहणाची वेळ असणार आहे. म्हणजेच ग्रहण फक्त चंद्रोदयाच्या वेळीच दिसेल. चंद्र सुमारे 17 मिनिटे पूर्णपणे झाकलेला असेल, ज्याला पूर्ण ग्रहण म्हणतात.
या दिवशी रंगपंचमी खेळणे शुभ आहे
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या आधी सुतकचा काळ सुरू होतो. या काळात पूजा, शुभ कार्यक्रम, शुभ समारंभ आणि धार्मिक विधी करण्यास मनाई आहे. म्हणूनच, लोकांना ग्रहण संपल्यानंतरच पूजा करण्याचा आणि शुद्धीकरण स्नान केल्यानंतरच धार्मिक कार्य करण्याचा सल्ला दिला जातो.
एकंदरीत भाद्र आणि चंद्रग्रहणामुळे यावेळी होळीच्या तारखांमध्ये निश्चितच फरक आहे, परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, 4 मार्च 2026 रोजी रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा करणे सर्वात शुभ आणि योग्य मानले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




