शेगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. खामगाव मार्गावरील एका नामांकित हॉटेलच्या मालकाने आपल्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे गुप्तपणे अंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत संबंधित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आले.
तक्रारीनुसार, आरोपी हॉटेल मालक ज्ञानेश्वर लिप्ते याने पीडित महिलेचे खासगी व्हिडिओ चोरून रेकॉर्ड केले आणि ते सार्वजनिक करण्याची धमकी देत तिचे लैंगिक शोषण केले. महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक छळही करण्यात आल्याचा आरोप आहे.
भीतीमुळे काही काळ महिला गप्प राहिली. मात्र, सततच्या त्रासाला कंटाळून तिने शेवटी शेगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरोधात लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिस आरोपीच्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करत असून आणखी महिलांचे व्हिडिओ सापडतात का, याचा तपास सुरू आहे.
शहर
- महाराष्ट्र: जुन्या वाहनांना हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी ३० जून २०२६ ची डेडलाईन
- नवी मुंबईत एसीबीचा मोठा दणका; अप्पर जिल्हाधिकारी २२ हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद
- मुंबई: नात्यातील विश्वासघात! मृत मावशीच्या बँक खात्यातून भाचीने लांबवले १.७ कोटी रुपये
- महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानातील गँगच्या संपर्कात असलेल्या ७ तरुणांना घेतले ताब्यात
महाराष्ट्र
- प्रशासनाचा पाषाणहृदयी चेहरा: लसीकरणानंतर चिमुरडीचा अंत, मृतदेह शवगृहात ठेवण्यास नकार दिल्याने आजोबांची रात्र नातीच्या मृतदेहासह मांडीवर.
- काळीज पिळवटून टाकणारी घटना: बुलढाण्यात लेकीच्या कन्यादानावेळीच पित्याचा हृदयविकाराने दुर्दैवी अंत.
- नंदुरबार: अगरवाल कुटुंबाची झेप! मिरची प्रक्रिया उद्योगातून वार्षिक ८० लाखांची कमाई
- मुंबई: मोबाईल चोरीचा 'नवा पॅटर्न'; शिवाजी पार्क आणि वांद्रे परिसरात नागरिक हैराण
गुन्हा
- प्रेमात विश्वासघात! अल्पवयीन प्रेयसीचा खाजगी व्हिडिओ बनवून केला व्हायरल; शिरोळमधील नराधमाला बेड्या
- नवी मुंबईत एसीबीचा मोठा दणका; अप्पर जिल्हाधिकारी २२ हजार रुपयांची लाच घेताना जेरबंद
- बीड: ६५ वर्षीय वृद्धाचे संतापजनक कृत्य; अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
- मुंबई: नात्यातील विश्वासघात! मृत मावशीच्या बँक खात्यातून भाचीने लांबवले १.७ कोटी रुपये
राजकीय
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
- मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा; तेलंगणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?
- राजकारणात असूनही चिमुरड्यांना न्याय देता येत नसेल, तर आपण फसलो आहोत; आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका
इतर
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
मनोरंजन
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
- प्रभासच्या 'फौजी' चित्रपटाच्या सेटवर शोककळा; भीषण अपघातात क्रू मेंबरचा मृत्यू, शूटिंग तात्पुरते स्थगित!
- बॉक्स ऑफिस धमाका: रितेशच्या 'राजा शिवाजी'ची विक्रमी घोडदौड; अक्षय कुमारचा 'भूत बंगला' २०० कोटींच्या पार
विडियो गॅलेरी

देश विदेश
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!
- हंताव्हायरसचा धोका! क्रूझवरील ३ जणांच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; आता पुढे काय?
- वय ७४ वर्षे आणि ७२ देशांची एकट्याने सफर! ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा जगप्रवासाचा प्रेरणादायी थरार
- अमेरिकेचा इराणला अंतिम इशारा! 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, अन्यथा बॉम्बहल्ल्यांना तयार राहा'; ट्रम्प यांची थेट धमकी!

























Subscribe to my channel




