‘मस्ती 4’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रुही सिंहसोबत मोठी फसवणूक झाली आहे. तिच्या नावाचा गैरवापर करून व्हॉट्स ॲपवर अश्लील चॅट केले जात आहेत. रुहीच्या नावाने व्हॉट्स ॲपचे चॅट्स लीक झाले आहेत. सोशल मीडियावर हे चॅट्स व्हायरल होत आहेत. या चॅट्सना खुद्द रुहीनेही तिच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केलं आहे. हे सर्व बनावट आणि बोगस असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. हे चॅट्स माझे नाहीत, कोणीतरी दुसरीच व्यक्ती माझ्या नावाचा गैरवापर करत असल्याचं रुहीने म्हटलं आहे. याप्रकरणी तिने पोलिसांत तक्रारसुद्धा दाखल केली आहे. त्यासोबत व्हॉट्स ॲप नंबरची माहिती देऊन लोकांना अलर्ट राहण्याची आणि फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला ब्लॉक करण्याची विनंती केली.
नेमकं काय आहे प्रकरण?
रुही सिंहने तिच्या नावाने व्हॉट्सॲपवर होणाऱ्या फसवणुकीविषयी लोकांना माहिती दिली आणि त्याचसोबत अश्लील चॅट्सचाही खुलासा केला. 8 फेब्रुवारी रोजी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्या बनावट नंबरची माहिती दिली, ज्यावरून चॅट केले जात होते. हा नंबर आहे.. 639 584 327. रुहीने स्पष्ट केलं ही हा तिचा व्हॉट्स ॲप नंबर नाहीत. तिने लोकांना लगेचच तो नंबर ब्लॉक करून रिपोर्ट करण्याचा विनंती केली आहे.
रुही सिंहने या नंबरवरून तिच्या नावाने केलेल्या चॅट्सचा स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला आहे. तिने लिहिलं, ‘ही मी नाही. जर तुम्हालाही अशाप्रकारचे घाणेरडे आणि अश्लील मेसेज येत असतील, तर कृपया तो नंबर ताबडतोब ब्लॉक करा. मी पोलीस आणि सायबर क्राइमकडे याबद्दल तक्रार करत आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने असे कारनामे करताना लाज वाटत नाही का?’
रुहीने ज्या चॅट्सचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, त्यात लिहिलंय, ‘मी एक फोटोशूट करायचा विचार करतेय, एकदम क्रेझी.. माझा मस्तीपूर्ण आणि क्रेझी स्वभाव कॅप्चर करण्यासाठी हे फोटोशूट असेल. माझी मस्ती आणि तुमच्या क्रिएटिव्ह कल्पना त्याला आणखी बेस्ट बनवतील. मी माझ्या प्रत्येक शूटमध्ये 100 टक्के मेहनत करते. परंतु त्यापलीकडे माझी एक वेगळी बाजू आहे. माझी बेबी साइड आणि मस्ती साइड.. हेच माझं खरं रुप आहे. समजलं ना तुम्हाला?’
कोण आहे रुही सिंह?
रुही सिंह ही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने 2011 मध्ये फेमिना मिस इंडिया ईस्टमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत ती फर्स्ट रनर अप ठरली होती. त्यानंतर 2012 मध्ये तिने फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता. त्यात ती टॉप 10 स्पर्धकांमध्ये स्थान पक्कं करण्यात यशस्वी ठरली होती. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून इन्स्टाग्रामवर तिचे 2 दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रुहीने ‘चक्रव्यूह’, ‘स्पॉटलाइट’, ‘परछाई’, ‘बँग बँग’ आणि ‘रनवे लुगाई’ यांसारख्या सीरिजमध्ये काम केलंय. रुहीने तिच्या करिअरची सुरुवात 2015 मध्ये मधुर भंडारकर यांच्या ‘कॅलेंडर गर्ल्स’मधून केली होती.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


