Assaulted for Long Hair: Youth Attacked with Knife in Nigdi After Being Mocked as ‘Potraj’

केस वाढवले म्हणून ‘पोतराज’ म्हटले अन् चाकू उगारला! निगडीत तरुणावर जीवघेणा हल्ला

Assaulted for Long Hair: Youth Attacked with Knife in Nigdi After Being Mocked as ‘Potraj’निगडी (पिंपरी-चिंचवड) - केस वाढवले म्हणून ‘पोतराज’ या शब्दाने संतापलेल्या टोळीने तरुणावर चाकूहल्ला केल्याची भयावह घटना निगडीत घडली. अथर्व गणेश शिंदे (२०) या तरुणावर चेहऱ्यावर, मानेवर आणि हातावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले. तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

नेमकं काय घडलं?
अथर्व शिंदे निगडी गावठाण येथे मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. तेथे गणेश लोणकर (केस वाढवलेले), पवन आणि यश यांच्यासोबत गप्पा मारत असताना अथर्वने गणेश लोणकरला ‘पोतराज’ म्हटले. या शब्दाने गणेश इतका संतापला की, वाद वाढला. नंतर भेळ चौकात गेल्यावर आकाश खिरडे, विकास खिरडे आणि निहाल यांच्या मदतीने अथर्वला पकडले. गणेश लोणकरने “मारून टाका” असे ओरडत चाकूने वार केले. चेहऱ्यावर, मानेवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या.

पोलिस कारवाई
निगडी पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात माजी नगरसेवकाच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

परिसरात भीती
या घटनेमुळे निगडी परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ शब्द आणि वादातून होणाऱ्या हिंसक घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *