3 Idiots Sequel! Aamir Khan Finally Confirms Development; Fans Rejoice Over the Long-Awaited News

३ आयडीयट्सचा सिक्वेल! आमिर खानने दिली मोठी पुष्टी

3 Idiots Sequel! Aamir Khan Finally Confirms Development; Fans Rejoice Over the Long-Awaited Newsबॉलीवूडचा रैंचो परत येतोय! '३ आयडीयट्स' च्या प्रचंड लोकप्रिय चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याची अधिकृत पुष्टी अभिनेता आमिर खान यांनी आज दिली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शन करणार असलेल्या या सिक्वेलमध्ये रांचो, फरहान आणि राजू यांच्या आयुष्याची १० वर्षांनंतरची कहाणी दाखवली जाणार आहे.

आमिर खान यांनी अमर उजाला या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “राजकुमार हिरानी सध्या '३ आयडीयट्स २' वर काम करत आहेत. मी त्यांचे Narration ऐकले आहे. ते खूप चांगले आहे. स्क्रिप्टवर अजून थोडे काम बाकी आहे, पण कथा अतिशय सुंदर आहे. त्यात पहिल्या चित्रपटासारखाच ह्युमर आहे आणि एक अनोखी स्टोरी आहे. ही तेच तीन आयडीयट्सची कहाणी आहे, पण १० वर्षांनंतरची.”

आमिर यांनी फुन्सुख वांगडू अर्थात रांचोची भूमिका पुन्हा साकारण्याची तयारी दर्शवली आहे. ते म्हणाले, “ही अशी एक फिल्म आहे ज्यावर मी लवकरच काम करणार आहे. अभिजात आणि राजू यांनी ही कथा खूप चांगली लिहिली आहे. मीही ती करण्यासाठी उत्सुक आहे.”

मूळ कलाकारांची पुनरागमन
पहिल्या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारे आर. माधवन (फरहान) आणि शरमन जोशी (राजू) हे देखील सिक्वेलमध्ये परतणार असल्याचे संकेत मिळत आहेत. करीना कपूर खान यांच्या भूमिकेबद्दलही चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुन्हा राजकुमार हिरानी करणार असून, स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात आहे.

२००९ चा ब्लॉकबस्टर
'३ आयडीयट्स' हा २००९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वकालीन यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. त्याने शिक्षण पद्धतीवर, दबावावर आणि जीवन जगण्याच्या मार्गावर टीका करत लाखो तरुणांच्या मनात घर केले. चित्रपटाने जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.

फॅन्स आता या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत.
कधी येणार?
शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे, मात्र रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही.

ही बातमी ऐकून 'आल इज वेल' म्हणत सर्व 'आयडीयट्स' फॅन्स आनंदात आहेत!



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *