Shocking Murder in Andheri: Brother and Sister-in-Law Arrested for Killing 80-Year-Old Woman and Dumping Body in Drain

"बहीण बेपत्ता आहे शोधून द्या", म्हणणाऱ्या भावाच्याच घरात सापडलं हत्येचं गुपित; अंधेरी पोलीसही हादरले!

Shocking Murder in Andheri: Brother and Sister-in-Law Arrested for Killing 80-Year-Old Woman and Dumping Body in Drainमुंबई: रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना मुंबईतील अंधेरी परिसरात समोर आली आहे. आपल्या ८० वर्षीय वृद्ध बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह नाल्यात फेकल्याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी तिचा सख्खा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे. जेमे सिक्यूअरा असे मृत महिलेचे नाव आहे.

नाल्यात सापडला होता मृतदेह:
काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व येथील एका नाल्यात साफसफाई सुरू असताना कामगारांना एक कुजलेला मृतदेह आढळला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट असल्याने त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींची तपासणी सुरू केली.

कपड्यांच्या वर्णनावरून लागला सुगावा:
तपासादरम्यान पोलिसांना सहार पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात नोंदवलेल्या एका 'मिसिंग' तक्रारीची माहिती मिळाली. मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि तक्रारीतील वर्णन जुळल्याने ती महिला जेमे सिक्यूअरा असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, ही तक्रार तिचा भाऊ जोसेफ थॉमस कोल्हीयो (६३) यानेच दिली होती.

हत्येचा बनाव कसा उघड झाला?
पोलिस जेव्हा अधिक चौकशीसाठी जेमेच्या घरी पोहोचले, तेव्हा जोसेफ आणि त्याची पत्नी मारिया कोल्हीयो यांच्या वागण्यात संशयास्पद बाबी आढळल्या. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

नेमकी घटना काय घडली?
आरोपी जोसेफने सांगितले की, काही दिवसांपूर्वी घरगुती वादातून त्याचा बहिणीशी जोरात वाद झाला. रागाच्या भरात त्याने तिला धक्का दिला, ज्यामुळे त्या खाली पडल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने घाबरलेल्या जोसेफने आपली पत्नी मारिया हिच्या मदतीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जवळच्या नाल्यात फेकून दिला. त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी 'बहीण बेपत्ता' असल्याची बनावट तक्रार पोलिसांत दिली.

अंधेरी पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली असून, या हत्येमागे मालमत्तेचा वाद किंवा अन्य काही कारण आहे का, याचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेने मरोळ आणि अंधेरी परिसरात खळबळ उडाली आहे.



विडियो गॅलेरी

1 thought on “"बहीण बेपत्ता आहे शोधून द्या", म्हणणाऱ्या भावाच्याच घरात सापडलं हत्येचं गुपित; अंधेरी पोलीसही हादरले!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *