डोंबिवली/ठाणे: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीचे ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे हे तब्बल १५ तास लोकलमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडून होते, मात्र रेल्वे प्रशासन, पोलीस आणि प्रवाशांपैकी कोणाचेही त्यांच्याकडे लक्ष गेले नाही.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संजय शिंदे हे बुधवारी (१५ एप्रिल) दुपारी ४ च्या सुमारास शीव (Sion) रेल्वे स्थानकातून लोकलमध्ये चढले होते. प्रवासादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते डब्यातच बेशुद्ध पडले. ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने आणि मोबाईल बंद असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी धारावी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती.
१५ तासांचा दुर्लक्षित प्रवास:
धक्कादायक बाब म्हणजे, दुपारी ४ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत शिंदे त्याच डब्यात बेशुद्ध पडून होते. ही लोकल रात्रभर अनेक फेऱ्या पूर्ण करून यार्डमध्ये तपासणीसाठीही गेली होती. यार्डमध्ये रेल्वे पोलीस आणि स्वच्छता कर्मचारी डब्यांची तपासणी करतात, मात्र कोणालाही डब्यात पडून असलेला हा प्रवासी दिसला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता कल्याण स्थानकावर प्रवाशांना ते एका बाकाखाली आढळले.
पोलिसांवर गंभीर आरोप:
संजय शिंदे यांच्या कुटुंबीयांनी रेल्वे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी शिंदे यांना मद्यपी समजून मारहाण केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका ज्येष्ठ नागरिकाला मदत करण्याऐवजी पोलिसांनी दाखवलेली ही अमानवीय वागणूक आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
रेल्वे प्रशासनाचा तपास:
या घटनेची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने आता सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू केली आहे. १५ तास एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत ट्रेनमध्ये राहतेच कशी, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पत्रकार संघटनांनी या प्रकरणी दोषी पोलीस आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!


























Subscribe to my channel




