मुंबई:
मुंबईतील आग्रीपाडा परिसरात एका १९ वर्षीय हिंदू तरुणीचा विनयभंग करून तिला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवणाऱ्या अशरफ सिद्दीकी (वय २५) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने पीडितेसह कंपनीतील इतर हिंदू मुलींनाही टार्गेट केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पीडित तरुणी महालक्ष्मी येथील एका नामांकित रिअल इस्टेट कंपनीत टेलीकॉलर म्हणून काम करत होती. आरोपी अशरफ हा देखील त्याच कंपनीत कामाला होता. फेब्रुवारी महिन्यात तरुणीने नोकरी सोडली, मात्र अशरफने ऑफिसच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून तिचा नंबर मिळवला. २१ एप्रिलपासून त्याने तरुणीला सतत मेसेज आणि कॉल करून 'मैत्री' करण्यासाठी दबाव टाकला.
अश्लील व्हिडिओ आणि धमकी:
तरुणीने नकार देऊनही अशरफ थांबला नाही. त्याने स्वतःचे अश्लील फोटो आणि पॉर्न व्हिडिओ तिला पाठवले. इतकेच नव्हे तर, त्याने तिला माझगाव येथील एका लॉजवर भेटायला येण्यासाठी धमकावले. "आजकाल हिंदू मुलींना मुस्लिम मुलेच आवडतात," असे आक्षेपार्ह विधान करत त्याने पीडितेचा मानसिक छळ केला. त्याने इतर ३-४ हिंदू मुलींचे फोटो दाखवून त्यांच्याशीही आपले संबंध असल्याचा खोटा दावा केला.
पीडितेची हुशारी आणि अटक:
या त्रासाला कंटाळून पीडितेने अत्यंत धैर्याने अशरफसोबतचे संभाषण रेकॉर्ड केले आणि सर्व पुरावे गोळा केले. त्यानंतर तिने वडिलांसह आग्रीपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून अशरफला तात्काळ अटक केली आहे.
राजकीय वातावरण तापले:
या घटनेचे पडसाद राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. भाजप पदाधिकाऱ्यांनी याला 'कॉर्पोरेट लव्ह जिहाद' असे संबोधले असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही पोलीस ठाण्याला भेट देऊन पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, अशरफने अजून किती मुलींना अशा प्रकारे त्रास दिला आहे, याचा शोध घेत आहेत.
शहर
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा अमरावतीत बोलबाला; संत्रा-आंब्याची अडीच हजार हेक्टरवर लागवड!
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीसाठी पंढरपूर मार्गावर १६ जादा एसटी बसफेऱ्या; वारीचा प्रवास होणार सुकर!
- जागतिक स्तरावर ट्रम्प यांच्या लोकप्रियतेला फटका; प्यू रिसर्च सेंटरच्या अहवालात धक्कादायक निष्कर्ष!
महाराष्ट्र
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा अमरावतीत बोलबाला; संत्रा-आंब्याची अडीच हजार हेक्टरवर लागवड!
- वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आषाढी वारीसाठी पंढरपूर मार्गावर १६ जादा एसटी बसफेऱ्या; वारीचा प्रवास होणार सुकर!
- जुन्नर 'पोक्सो' खटल्याचा निकाल! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमाला ३ वर्षांचा सश्रम कारावास!
गुन्हा
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
- बुलढाणा: 'क्रांतीज्योती' योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच मागणारा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel



