पुणे: बारामती येथील उद्योजक राणा सूर्यवंशी यांना 'वाय प्लस' (Y-Plus) सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष)चे युवा आमदार रोहित पवार यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे. माळेगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राणा सूर्यवंशी प्रकरण, बारामतीमधील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था आणि टोरंट प्रकल्पावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, हल्ला प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती व सत्य समोर येण्याआधीच संबंधित व्यक्तीला 'वाय प्लस' सुरक्षा देण्यामागे नेमके कारण काय? यामागच्या हेतूची कसून चौकशी झाली पाहिजे. राणा सूर्यवंशी यांचे तीन मित्र अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत, या मुद्द्याकडे लक्ष वेधत त्यांनी संशय व्यक्त केला की, संबंधितांचा शोध आणि त्यांची चौकशी अद्याप पूर्ण का झालेली नाही? विशेष तपास पथकाचे (SIT) प्रमुख सदानंद दाते यांच्याकडे या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात तपास खूप संथ गतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. राणा सूर्यवंशी रुग्णालयातून नेमके कधी बाहेर पडले, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही, त्यामुळे ही सुरक्षा मिळवण्यामागे कोणती राजकीय किंवा व्यावसायिक पार्श्वभूमी आहे का, याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात राज्याच्या गृह विभागाने गांभीर्याने लक्ष घालून सर्व सत्य जनतेसमोर आणावे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यामध्ये त्वरित हस्तक्षेप करावा, असे आवाहन त्यांनी केले. बारामतीसारख्या शहराचे नाव खराब करणाऱ्या आणि गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्या घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका रोहित पवार यांनी मांडली.
बारामतीमधील कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळत्या स्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करत पवार म्हणाले की, शहरात लूटमार, हप्तेखोरी आणि गँगवॉरच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पोलिसांसमोरच अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर गुन्हेगारांवर नेमके कोणाचे नियंत्रण आहे, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. रोडरोमिओंच्या वाढत्या त्रासामुळे संध्याकाळनंतर महिला व मुलींना घराबाहेर पडताना असुरक्षित वाटत आहे, यावरून प्रशासनाचा गुन्हेगारांवरील वचक आता पूर्णपणे कमी झाल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. याशिवाय, टोरंट प्रकल्पाबाबत बोलताना त्यांनी हा प्रकल्प स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधाचा विचार करून अन्यत्र हलवण्याचा विचार करावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देऊन प्रश्न सुटणार नाहीत, तर नागरिकांना विश्वासात घेऊनच शासनाने पुढील निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहर
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
- मुंबई: बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती दालनाचं उद्घाटन कोण करणार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितले, सत्ताधाऱ्यांना लगावला टोला
- मुंबई: लोकलमध्ये धक्कादायक थरार! दोन प्रवाशांच्या भांडणात फेकलेला चाकू घुसला तिसऱ्याच निष्पाप प्रवाशाच्या छातीत; अंधेरीतील घटना
महाराष्ट्र
- पुणे: भक्तीचा महासागर! प.पू. श्री शंकर महाराजांच्या प्रगटदिन सोहळ्याला उत्साहात सुरुवात, दिवसभर दर्शनासाठी उसळली अलोट गर्दी
- कोल्हापुर: केएसए फुटबॉल लीगचा महासंग्राम १ डिसेंबरपासून सुरू होणार; वेळापत्रक जाहीर, कधी अन् कोणत्या संघात रंगणार सामने?
- पुणे: रिंगरोड'ला अजित पवारांचे नाव देण्याच्या मागणीवरून रोहित पवारांनी राज्य सरकारची केली कोंडी; पुण्यतिथीला आंदोलनाचा इशारा
- छत्रपती संभाजीनगर: आधी जीआर, मगच माघार!; सुधारित वेतनश्रेणीसाठी राज्यातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प
गुन्हा
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
- कोल्हापूर: पुणे रेल्वे प्रवासादरम्यान धक्कादायक घटना हातकणंगलेत रेल्वेखाली सापडून विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; आत्महत्या की घातपात? चर्चांना उधाण
- पुणे: आळंदीत दिवसाढवळ्या थरारक रक्तपात! जुन्या वादातून पीसीएमटी चौकात रिक्षाचालकावर खंजीराने जीवघेणा हल्ला; परिसरात एकच दहशत
- धाराशिव: मोबाईलसाठी पैसे दिले नाही म्हणून जन्मदात्या वडिलांची झोपेतच हत्या; पोटच्या मुलाच्या कृत्याने धाराशिव हादरले!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकहिताचे काम करत राहणार आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची गोवा येथे गर्जना
- नवी दिल्ली: पाठिंब्याबाबत शरद पवार गटाच्या संकेतांमुळे NDAला मिळाले बळ; संसदेत १० ते १५ मते अधिक मिळण्याची शक्यता
- कर्नाटक: सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनाला निघालेल्या पुण्यातील कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जागीच ठार!
- गोवा: महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यावर सरकारचा विशेष भर; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन


























Subscribe to my channel



