मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाच्या दृष्टीने चार अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये उद्योग, ऊर्जा, शिक्षण आणि महसूल अशा विविध विभागांशी संबंधित विषयांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय खालीलप्रमाणे:
१. महाराष्ट्र राज्य कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) धोरण २०२६:
राज्यात पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना देण्यासाठी 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण' जाहीर करण्यात आले आहे. या प्रकल्पांसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, हे प्रकल्प पीपीपी (PPP) आणि हायब्रीड अन्युईटी तत्त्वावर राबवले जाणार आहेत. यामुळे घनकचऱ्याचे व्यवस्थापन सोपे होईल आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. प्रत्येक जिल्ह्यात यासाठी समन्वय समिती स्थापन केली जाईल.
२. साताऱ्यात नवीन आयटी पार्क:
सातारा जिल्ह्यातील मौजे नागेवाडी येथे आयटी पार्क उभारण्यासाठी ४२.५५ हेक्टर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास (MIDC) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सातारा आणि परिसरातील तरुणांना आयटी क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
३. सात आदर्श महाविद्यालयांतील शिक्षकांना दिलासा:
राज्यातील सात आदर्श महाविद्यालयांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या शिक्षकांना आता युजीसीच्या (UGC) निर्देशानुसार मूळ वेतन मिळणार आहे. तसेच, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या पुढील पदभरतीमध्ये या शिक्षकांना अतिरिक्त गुणांचा लाभ दिला जाणार आहे.
४. जमीन धारणा मर्यादेत सुधारणा:
महसूल विभागांतर्गत राज्यातील कमाल जमीन धारणा मर्यादा नियमानुसार, भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरण करण्याच्या अधिमूल्याची (Premium) पुनर्रचना करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच नवीन अधिसूचना काढली जाईल.
यासोबतच, मुंबईतील प्रसिद्ध के.ई.एम. (KEM) रुग्णालयाचे नाव बदलून "कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय" करण्याचा प्रस्ताव मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडला असून, त्यावरून सध्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शहर
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- पुणे: पहाटेच गोळीबाराचा थरार! वानवडीत पोलीस-गुन्हेगारात चकमक; ३० गुन्हे असलेला सराईत करण सिंग जखमी.
- अहिल्यानगर: लेकीला वाचवण्यासाठी बापाची बिबट्याशी झुंज; थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
- मुंबई: आषाढी वारीसाठी एसटी सज्ज! वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार ५,५०० विशेष बसेस; थेट गावातून मिळणार पंढरपूरची बस.
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: राज्यातील कारागृह प्रशासनाचा कणाच खिळखिळा; १२ वर्षांपासून 'तुरुंगाधिकारी श्रेणी-२'ची भरती ठप्प, ७० टक्के पदे रिक्त!
- पुणे: पोलिसांची धडाकेबाज कारवाई! केमिकल कंपनीच्या गोडावूनमधून ऑर्थो फॉस्फरिक ॲसिड चोरणारी टोळी गजाआड.
- पुणे: ओतूर येथे भीषण अपघात; वडिलांसह ३ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
- अमरावती: 'निम-आराम'च्या नावाखाली प्रवाशांची लूट; वरूड-नागपूर मार्गावरील भंगार बस आणि जाहिरातींचा सुळसुळाट!
गुन्हा
- उत्तर प्रदेश: हुंड्याच्या राक्षसाने घेतला अंजलीचा बळी! "त्यांनीच माझ्या बहिणीला विष पाजले...", भावाचा पोलिसांसमोर टाहो.
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ५ कोटींची फसवणूक; हिंजवडीतील अहेरकर कुटुंब गजाआड
- पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!
राजकीय
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
- "मी मोठ्या धर्मसंकटात!" शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर खासदार ओमराजे निंबाळकरांनी अखेर सोडलं मौन
इतर
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
- औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज १५ मिनिटं करा हे काम; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला!
- मराठा-कुणबी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! 'सारथी'ची परदेशी शिष्यवृत्ती आता पूर्ण अनुदानित; शैक्षणिक शुल्काची मर्यादा हटवली
- दैनिक राशिभविष्य १८ जून २०२६: गजकेसरी राजयोगामुळे या राशींचे नशीब फळफळणार, मिळणार धनलाभ!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विक्रमी कामगिरी! वैभव सूर्यवंशीचा धमाका; अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम!
- हरियाणा: पोलीस ठाण्यात कर्करोगग्रस्त रुग्णाला बेदम मारहाण; दोषी ३ पोलीस कर्मचारी निलंबित
- देशातील महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर आता हवामानानुसार बदलणार 'स्पीड लिमिट'; नियमांचे उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान!
- नवी मुंबई: विमानतळावर पाणीगळतीचा व्हिडीओ व्हायरल; विमानतळ प्रशासनाचे स्पष्टीकरण, 'प्रवाशांची दिशाभूल होतेय!'


























Subscribe to my channel


