कोल्हापूर: कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत सतत घरात शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पोटच्या मुलाचा जन्मदात्या बापानेच चाकूने भोसकून खून केला. त्यानंतर मुलाचा मृत्यू शिवजयंतीच्या मिरवणुकीत अपघातामुळे झाल्याचा बनाव वडिलांनी रचला, मात्र राजारामपुरी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या खुनाचा छडा लावून आरोपी वडिलांना जेरबंद केले.
नेमकी घटना काय?
मयत जुनेद गफूर पठाण (वय २१) हा भंगारच्या दुकानात कामाला होता, मात्र त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते. तो दररोज नशेत घरात पत्नी आणि आई-वडिलांना त्रास द्यायचा. सोमवारी रात्री जुनेद पुन्हा दारू पिऊन आला आणि त्याने वडील गफूर पठाण यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या भांडणानंतर तो शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचण्यासाठी गेला. वडील त्याला ओढत घरी घेऊन आले, तिथे पुन्हा त्यांच्यात वाद झाला. संतापलेल्या वडिलांनी स्वयंपाकघरातील चाकूने जुनेदवर वार केले, ज्यात तो गंभीर जखमी झाला.
बापाचा फसलेला बनाव:
जुनेदला गंभीर अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वडिलांनी पोलिसांना सांगितले की, मिरवणुकीत नाचत असताना ट्रॉलीचा पत्रा लागून जुनेद जखमी झाला. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जखमेचे स्वरूप पाहून डॉक्टरांना आणि पोलिसांना संशय आला. पोलिसांनी वडिलांना खाक्या दाखवताच त्यांनी रागाच्या भरात खून केल्याची कबुली दिली.
उद्ध्वस्त झालेलं कुटुंब:
या घटनेमुळे विक्रमनगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. व्यसनाने एका तरुणाचा जीव घेतला, तर रागाच्या भरात केलेल्या कृत्यामुळे जन्मदाता बाप आता तुरुंगात गेला आहे. पठाण कुटुंबाचा कर्ता पुरुषच कोठडीत गेल्याने संपूर्ण कुटुंब आता रस्त्यावर आले आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




