मुंबईत भोंदूबाबाचा अघोरी प्रकार उघड; मालाडमधील गार्डनमध्ये ‘जादूटोणा’ सुरू असल्याचा आरोप

 

 

Mumbai :मुंबईच्या मालाड परिसरात एका तथाकथित भोंदूबाबाविरोधात स्थानिकांनी गंभीर तक्रार दाखल केली आहे. दर गुरुवार आणि रविवार या दिवशी तो “भूत उतरवण्याच्या” नावाखाली अघोरी पूजा करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्तीने 4 एप्रिल रोजी महापालिकेच्या गार्डनमध्ये शेकडो लोकांना एकत्र करून उघडपणे पूजा केली. या वेळी जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितले जात आहे.

पूजेसाठी वापरले जाणारे साहित्य

स्थानिकांच्या दाव्यानुसार, या पूजेत खालील वस्तूंचा वापर केला जातो:

  • बकऱ्याचा कलेजा
  • काळे व लाल कापड
  • स्मशानातील राख
  • लिंबू
  • टाचणी
  • दारूची बाटली
  • कुंकू
  • सिगारेट

हे साहित्य चार रस्ते मिळतात अशा ठिकाणी टाकले जात असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.

स्थानिकांचा आरोप आणि मागणी

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषतः महिला आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिकांनी संबंधित व्यक्तीवर अंधश्रद्धा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करून अटक करण्याची मागणी केली आहे.

तक्रारदारांचे म्हणणे आहे की, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून याबाबत पोलिसांकडे व्हिडिओ पुरावेही सादर करण्यात आले आहेत.

भोंदूबाबाचे स्पष्टीकरण

संबंधित व्यक्तीने सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याचे म्हणणे आहे की, तो कोणताही जादूटोणा करत नाही, तर “पूजा करून लोकांची सेवा” करत आहे. तसेच, या माध्यमातून कोणताही आर्थिक लाभ घेत नसल्याचा दावाही त्याने केला आहे.

पुढील कारवाईकडे लक्ष

या प्रकरणात पोलिसांकडून अद्याप अधिकृत कारवाई झाल्याचे स्पष्ट नाही. त्यामुळे पुढे नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *