
Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी आज, गुरुवारी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत नगरसेवक फुटून दुसऱ्या पक्षात जाऊ नयेत, म्हणून भाजपने आपल्या ६५ नगरसेवकांना बुधवारी अज्ञात स्थळी हलवले. तिथून सर्व नगरसेवक गुरुवारी थेट महापौर निवडणुकीला महापालिका मुख्यालयात हजर राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महापालिका निवडणुकीत सर्वाधिक ६५ नगरसेवक निवडून आल्याने भाजपने महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, याचबरोबर ४२ इतके कमी संख्याबळ असतानाही शिवसेनेने दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत. भाजपचे नाराज नगरसेवक आपल्या संपर्कात असून, याद्वारे महापौर आणि उपमहापौरपदासाठी लागणारी मॅजिक फिगर आपण गाठू, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आहे. भाजपच्या १२ नगरसेवकांच्या संपर्कात शिवसेनेचे नेते आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळे ऐन महापौर निवडणुकीच्या वेळी नगरसेवकांची पळवा पळवी होऊ शकते. ही धोक्याची घंटा लक्षात घेऊन नवी मुंबईतील भाजपच्या वतीने आपल्या सर्व ६५ नगरसेवकांना भाजपने गेट-टुगेदरसाठी बुधवारी दुपारपासूनच अज्ञात स्थळी हलवले आहे. या नगरसेवकांचे मोबाइलही नॉट रिचेबल झाले आहेत. सर्वांना अज्ञात स्थळावरून थेट महापौर निवडणुकीसाठी महापालिका मुख्यालयातच आणले जाणार आहे.
|
|
भाजपचे काही नगरसेवक आपल्याकडे येतील आणि महापौर आणि उपमहापौरपदासाठी लागणारी मॅजिक फिगर आपण गाठू या आशेनेच नवी मुंबईतील शिवसेनेने संख्यबळ कमी असतानादेखील महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरले आहेत. हे अर्ज भरून त्यांनी एक प्रकारे वनमंत्री गणेश नाईकांना आव्हान दिल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेत सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयाला आलेल्या भाजपच्या महापौर - उपमहापौर पदासाठीच्या उमेदवारांचा सस्पेन्स कायमच आहे. त्यामुळे नगरसेवक देखील संभ्रमात सापडे आहेत. सर्वांचे डोळे मुंबईत होणाऱ्या निर्णयाकडे लागले आहेत. दोन्हीही पदांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शुक्रवार (सहा फेब्रुवारी) हा शेवटचा दिवस आहे. महापालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. ११५ पैकी ५७ नगरसेवक निवडून आणण्यात भाजप यशस्वी झाला. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचा महापौर भाजपचाच होणार हे स्पष्ट झाले. बहुमतासाठी भाजपला केवळ एक मत कमी आहे. सध्या पालिकेच्या सभागृहात भाजप - शिवसेनेच्या युतीबद्दल निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर ही दोन्हीही पदे युतीचा निर्णय न झाल्यास भाजपला मिळू शकतील असे मानले जात आहे. त्यामुळे या दोन्हीही पदांसाठीच्या उमेदवारांची घोषणा भाजपच्या नेतृत्वाकडून केली जाईल असे सांगितले जात आहे.
शहर
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल


























Subscribe to my channel




1 thought on “Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची धास्ती; भाजपचे ६५ नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना, महापौर निवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट”