
Pune : पिंपरी-चिंचवड शहरातून एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. आंब्याचे आमिष दाखवत अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी 47 वर्षीय विजय पोपट भोसले याला काळेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विजय भोसले हा काळेवाडी परिसरात कुटुंबासह राहत होता. पीडित चिमुरडीचे कुटुंबही त्याच भागात वास्तव्यास आहे. सोमवारी दुपारी चिमुरडी तिच्या दोन बहिणींसोबत घराजवळ खेळत असताना आरोपीने आंबा देण्याचे आमिष दाखवत तिन्ही मुलींना जवळ बोलावले. त्यानंतर दोन मुलींना बाहेर पाठवून त्याने चिमुरडीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, चिमुरडीची आई अचानक घटनास्थळी पोहोचली आणि तिने हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला. या धक्कादायक घटनेनंतर चिमुरडीला तातडीने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाव घेतली. पीडितेच्या आईकडून सविस्तर जबाब घेतल्यानंतर काही तासांतच आरोपीला अटक करण्यात आली.
या घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेषतः ओळखीतील व्यक्तीकडूनच असा प्रकार घडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेवाडी पोलीस करत आहेत.
शहर
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: "मानसिक नक्षलवादी" म्हणजे नक्की काय? पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा; खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल
- पुणे: माळशेज-भोरांडे जलविद्युत प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या आक्षेपांमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले
- नवी मुंबई: महापेमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल टेक सपोर्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची लूट
महाराष्ट्र
- मुंबई: राज ठाकरेंचा अपमान; भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: "मानसिक नक्षलवादी" म्हणजे नक्की काय? पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा; खासदार सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल
- पुणे: माळशेज-भोरांडे जलविद्युत प्रकल्पाच्या जनसुनावणीला स्थगिती; खासदार डॉ. अमोल कोल्हेंच्या आक्षेपांमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले
- नवी मुंबई: महापेमध्ये बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश; ॲपल टेक सपोर्टच्या नावाखाली अमेरिकन नागरिकांची लूट
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: स्वातंत्र्यदिनी काळाचा घाला! अंघोळीची हौस बेतली जिवावर, गोंदियातील ढासगड येथे दोन तरुण वाहून गेले
- लखनऊ: शिक्षणाचा खेळ; जेन-झीनंतर आता जेन-अल्फा आक्रमक; लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे रस्त्यावर उतरून आंदोलन
- नवी दिल्ली: नितीन नबीन यांच्या टीममध्ये 'जेन झी'ची एन्ट्री; भाजपात मोठे बदल, महाराष्ट्रातून कुणाला संधी?
- अरुणाचल प्रदेश: मुसळधार पावसामुळे निसर्गाचा कोप; अचानक आलेल्या पुरात लष्कराचे ५ जवान बेपत्ता, तर भूस्खलनात ४ मजुरांचा मृत्यू

























Subscribe to my channel




