
Amravati : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांमध्ये अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका संशयिताने प्रेमाचे आमिष दाखवून अनेक युवतींना जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
भाजपकडून सुमारे १८० हून अधिक मुलींचे जवळपास ३५० व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. नाशिकमधील गाजलेल्या खरात प्रकरणानंतर आता हा प्रकार समोर आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
ब्लॅकमेलिंगचा संशय
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने संबंधित तरुणींसोबतचे खाजगी क्षण स्वतःच चित्रित केले. नंतर हे व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल करण्यात आले. व्हिडिओतील परिस्थिती पाहता, ब्लॅकमेल करून वारंवार शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणात एकटाच आरोपी नसून, त्याला काही साथीदारांची मदत असण्याची शक्यता देखील पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
आरोपी फरार
घटना उघडकीस येताच संशयित आरोपी कुटुंबासह फरार झाला आहे. त्याच्या घराला सध्या कुलूप असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. अद्याप कोणतीही पीडिता अधिकृतपणे पुढे आलेली नसली तरी व्हायरल व्हिडिओंच्या आधारे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
राजकीय स्तरावरही खळबळ
या प्रकरणात खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी लेखी निवेदन देत महंमद अयान आणि महंमद झोयान या दोन संशयितांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या निवेदनानंतर पोलिसांनी चौकशीला वेग दिला असून, दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.
मानव तस्करीचा संशय
या प्रकरणात आणखी गंभीर बाब समोर आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून हॉटेलमध्ये नेऊन त्यांचे चित्रीकरण केले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच काही मुलींना मुंबई-पुण्यासारख्या शहरांत विकण्याचा कट रचला जात असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. विरोध करणाऱ्या मुलींना व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही समोर आले आहे.
पोलिसांचे आवाहन
अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की,
- पीडितांनी न घाबरता पुढे यावे
- कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये
- सामाजिक सलोखा राखावा
हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, आरोपींना अटक केल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel





https://shorturl.fm/sx440