
Nagpur : नागपूरमध्ये अंमली पदार्थ तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून तस्करांनी शॅम्पूच्या साध्या बाटल्यांचा वापर करून कोकेन लपवण्याची क्लृप्ती वापरल्याचे समोर आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) नागपूर युनिटने केलेल्या कारवाईत तब्बल ₹4 कोटी 26 लाख किमतीचे 853 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीनुसार, हजरत निजामुद्दीन–केएसआर बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसमधून एक महिला दिल्लीहून बेंगळुरूकडे कोकेनची तस्करी करत असल्याची माहिती DRI अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचण्यात आला. गाडी आल्यानंतर संशयित महिलेवर लक्ष ठेवण्यात आले आणि पुढे अजनी स्थानकावर तिला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
सुरुवातीच्या तपासात तिच्याकडे कोणतेही संशयास्पद साहित्य आढळले नाही. मात्र तिच्या सामानातील दोन शॅम्पूच्या बाटल्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या. बाटल्यांतील द्रव काढून तपासणी केली असता त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या 50 सीलबंद कॅप्सूल्स आढळल्या. या कॅप्सूल्समध्ये पांढऱ्या रंगाचे कोकेन कौशल्याने लपवण्यात आले होते.
फील्ड ड्रग टेस्टमध्ये हा पदार्थ कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे एकूण वजन 853 ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे ₹4.26 कोटी असल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणी संबंधित महिलेला एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणामागे मोठे आंतरराज्य रॅकेट सक्रिय असल्याचा संशय असून तिच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!



























Subscribe to my channel




