11 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

मी त्यांना ‘लिटर वॉरियर्स’ म्हणतो, कारण यातील प्रत्येक जण मॉर्निंग वॉकदरम्यान जाणाऱ्या वाहनांतून फेकलेल्या फास्ट फूड कंटेनरचे १०० तुकडे उचलतो. त्यातील काही गोठलेल्या रस्त्यावरून एक-एक तुकडा काढतात, काही फोटो काढतात आणि एआय पॉवर्ड टूलमध्ये अपलोड करतात. हे टूल लोकेशन, कचऱ्याचा प्रकार आणि ज्या फास्ट फूड आउटलेटमधून ते आले आहे त्याचे नाव नोंदवते.
इंग्लंडच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या या प्रयोगादरम्यान लिटर वॉरियर्सना आढळले की, बहुतेक कचरा मॅकडोनाल्ड्स आणि कोस्टा कॉफीच्या अशा आउटलेट्समधून आला आहे, जे संरक्षित नॅशनल लँडस्केपपासून अनेक मैल दूर आहेत. कचऱ्याच्या पिशव्या भरताना ते न खाल्लेल्या बिग मॅक, चीज बर्गर, नगेट्स आणि फ्रेंच फ्राइजने भरलेली एक पिशवीही गोळा करतात. हे स्वयंसेवक ‘फास्ट लिटर’ नावाच्या अभियानासह या लढाईच्या आघाडीवर आहेत. हे एक अभियान आहे, ज्याचे नाव लोकांनी ग्रामीण भागात, विशेषतः चालत्या कारमधून खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे पॅकेजिंग फेकण्याच्या प्रवृत्तीवरून ठेवले आहे.ग्लूस्टरशायर विद्यापीठाचे सायबर तज्ज्ञ आणि स्ट्राउड डिस्ट्रिक्ट कौन्सिलच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून या टीमने सामान्यतः दुर्लक्षित राहिलेल्या या समस्येला ‘फास्ट लिटर’ नाव दिले आहे. आता ते पहिला डेटा सेट गोळा करत आहेत, जेणेकरून कचऱ्याची समस्या किती व्यापक झाली आहे हे समजेल. यामुळे हा कचरा निर्माण करणारे आणि तो फेकला जाणारे हॉटस्पॉट ओळखले जातील. यामुळे भविष्यात या वॉरियर्सना कारवाई करण्यास आणि टार्गेटेड अँटी-लिटर कँपेन राबवण्यास मदत मिळेल. पुढील महिन्यात येणारे एआय वॉवर्ड ॲप आता नव्याने समोर येणाऱ्या ग्राहक वर्तणुकीवर लक्ष केंद्रित करत आहे, जे कारमध्ये बसून खाणे आणि कचरा कुठेही किंवा ग्रामीण भागात फेकण्याशी संबंधित आहे.या वॉरियर्सचे मानणे आहे की, एआयच्या मदतीने कचऱ्याची अशी मोजदाद मॅकडोनाल्ड्स आणि कोस्टा कॉफीसारख्या कंपन्यांवर स्वच्छतेचा खर्च उचलण्यासाठी दबाव टाकण्यास मदत करेल. सायबर सुरक्षेचे सीनियर लेक्चरर आणि या प्रोजेक्टचे प्रमुख अन्वेषक रिचर्ड कुक यांनी गेल्या वर्षाच्या ताळेबंदाचा हवाला देत सांगितले की, फास्ट फूड हा सर्वाधिक नफा देणारा व्यवसाय आहे आणि ब्रिटनमध्ये मॅकडोनाल्ड्सचा ऑपरेटिंग प्रॉफिट ११ दशलक्ष पौंडांवरून ७६ दशलक्ष पौंडांपर्यंत वाढला होता. एआयच्या मदतीने त्यांनी अशी बारीक माहितीही शोधली आहे, जी सहसा दुर्लक्षित केली जाते. उदाहरणार्थ, या रेस्टॉरंटच्या इन-स्टोअर डायनिंग सुविधेच्या तुलनेत त्यांच्या ड्राइव्ह-थ्रू आउटलेट्समुळे रस्त्यांवर कचरा कसा वाढत जातो. एकूण २,६८० ड्राइव्ह-थ्रू पैकी १,०८० एकट्या मॅकडोनाल्ड्सचे आहेत आणि कोस्टा कॉफी तसेच स्टारबक्सही हळूहळू वाढत आहेत.
एआयमुळे उघड झाले आहे की, हा कचरा माती आणि संपूर्ण इकोसिस्टिममध्ये कसा मिसळत आहे. डेटा सेट वाढण्यासोबतच एआय टूल केवळ लिटर हॉटस्पॉट्सचा अंदाजच लावणार नाही, तर काही विशिष्ट भागात परवानगी देण्यापूर्वी नागरी संस्थांनाही विचार करण्यास मदत करेल. कुक यांच्या मते, जिथे कचऱ्याचा प्रश्न आहे, तिथे कुणीही याबद्दल अनेक लढाया लढू शकतो. त्यांना आशा आहे की, त्यांचा हा प्रोजेक्ट अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांविरुद्ध नक्कीच यशस्वी होईल, ज्या स्वतः नफा कमवतात आणि स्वच्छतेची जबाबदारी नागरी संस्थांवर ढकलतात. हे लिटर वॉरियर्स मानतात की, फूड-ऑन-द-गो व्यवसायासाठी एक ‘व्हॉलंटरी कोड ऑफ प्रॅक्टिस’ लागू केली पाहिजे, ज्यामध्ये आउटलेट्सवर अँटी-लिटर साइनेज, परिसराच्या आसपास दररोज कचरा उचलण्याची सक्ती, जनजागृती आणि कठोर कारवाईच्या तरतुदी असल्या पाहिजेत. खरे तर, मी स्वतःही एक प्रोजेक्ट केला होता की मॅकडोनाल्ड्सने केवळ अमेरिकेतच नाही, तर मुंबईत १९९९-२००० मध्ये त्यांचे आउटलेट उघडल्यानंतर आसपासची सफाई कशी केली होती. जेव्हा मी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री कव्हर करत होतो, तेव्हा ते सर्वात जबाबदार फास्ट फूड आउटलेट्सपैकी एक होते.

तुमच्या मोबाइलवर हा कॉलम ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
शहर
- टोमॅटोच्या किमती गगनाला भिडल्या! सामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा 'अनुदानित' विक्रीचा मोठा निर्णय
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
महाराष्ट्र
- शेअर बाजाराची दमदार 'यु टर्न' कामगिरी; सेन्सेक्स ७९० अंकांनी वधारला, निफ्टी पुन्हा २४,००० च्या पार!
- जालन्यात खळबळ: दीड वर्षात १५ बांगलादेशी घुसखोर जेरबंद; बनावट ओळखपत्रांचे मोठे रॅकेट उघड!
- इंडिगोची एअरपोर्ट टॅक्सी सेवा सुरू! आता अवघ्या ४९ रुपयांपासून कॅब बुकिंग, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
गुन्हा
- अमरावतीत अंगावर काटा आणणारी घटना! सकाळी फिरायला निघालेल्या मुलालाच आढळला वडिलांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह; ६५ वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या
- लोहगड किल्ला हत्याकांडाचा धक्कादायक खुलासा! केतन अग्रवालचा मृत्यू 'अपघात' नसून मंगेतर आणि तिच्या प्रियकराने केलेली सुनियोजित हत्या
- मुंबई: लोकलमध्ये प्रवाशावर जीवघेणा हल्ला; दरवाजा बंद करण्याच्या वादातून तरुणावर चाकूने वार!
- गोव्यातील आलिशान सोसायटीतून चालत होते सायबर फ्रॉडचे साम्राज्य; ६.२५ कोटींचे व्यवहार उघड, १२ जणांना बेड्या
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- स्कोडाची दमदार एन्ट्री! एका चार्जवर ६४७ किमी धावणार ७-सीटर लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्ही 'पीक' (Peaq) लाँच
- उत्तर प्रदेशात खळबळ! काकी गरोदर राहिली अल्पवयीन पुतण्यामुळे; नात्याला काळीमा फासणाऱ्या प्रकरणामुळे गाव हादरले!
- प्रवाशांसाठी मोठा दिलासा! हायवेवर आता मिळणार गाडी दुरुस्ती आणि पंचरची सुविधा; NHAI चा महत्त्वाचा निर्णय
- टेलिग्रामवरील बंदी अखेर उठली; मात्र 'मेसेज एडिटिंग' फिचर ३० जूनपर्यंत बंदच राहणार
























Subscribe to my channel




