
Pune : नऊ वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा दहा दिवसांच्या रणधुमाळीनंतर आज (मंगळवारी) सायंकाळी थंडावतील. मागील दहा दिवसांपासून शहरावर राजकीय ज्वर चढल्याचे चित्र होते.
सत्तेतील मित्रपक्षांनीच एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप, जाहीरनाम्यातून दिलेली अनिर्बंध आश्वासने, सभा आणि मुलाखती, शहरभर फिरणाऱ्या कर्णेवाल्या रिक्षा, एलईडी स्क्रीन असलेल्या व्हॅन अशा विविध प्रकारे पुणेकरांनी हा प्रचार अनुभवला. आज अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या सभा व 'रोड शो'; तसेच राज ठाकरे यांच्या 'रोड शो'ने प्रचाराची सांगता होईल.
|
ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख जाहीर; कोर्टाने आयोगाला दिली पुन्हा मुदत |
पुण्यासह राज्यातील एकूण २९ महापालिकांसाठीची निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी निवडणुकांची घोषणा केली. तेव्हापासून आचारसंहिता लागू झाली. अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबर ही अखेरची मुदत होती. त्यानंतर दोन जानेवारी रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले. त्यानंतरच प्रचाराला खऱ्या अर्थाने रंगत
विविध पक्षांकडून पारंपरिक प्रचाराबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचाही जोरदार वापर करण्यात आला. त्यामुळे शहरभर राजकीय रणधुमाळी अनुभवायला मिळाली. महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचाराची मुदत आज (मंगळवारी) सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात येणार आहे. त्यामुळे साडेपाचनंतर कोणत्याही प्रकारे प्रचार करता येणार नाही. साडेपाचनंतर सर्व राजकीय पक्षांनी बॅनर, पोस्टर्स, होर्डिंग्ज काढून घ्यावेत, असे आदेश महापालिका आयुक्त व शहर निवडणूक अधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले आहेत.
वाण वाटण्यास बंदी
बुधवारी (१४ जानेवारी) मकर संक्रांत आहे. मकरसंक्रांतीला वाण (भेटवस्तू) वाटण्याची पद्धत आहे. याचा राजकीय वापर होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व उमेदवारांना कुठल्याही प्रकारे भेटवस्तू-वाण वाटता येणार नाही. वाटल्यास कारवाई केली जाईल, अशी तंबीही नवलकिशोर राम यांनी दिली आहे.
अजित पवारांचा 'रोड शो'
राष्ट्रवादी काँग्रेससाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता नन्हे येथून 'रोड शो'ला सुरुवात करतील. सिंहगड रस्ता, वारजे परिसरानंतर औंध बोपोडीत 'रोड शो' होईल. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची दुपारी पत्रकार परिषद होणार आहे.
मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज दुपारी एक वाजता गोखलेनगर येथे होणार आहे. याशिवाय दुपारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद होणार आहे, तर उमेदवारांनी प्रभागातून प्रचारफेरी काढण्याचे नियोजन केले आहे.
राज ठाकरे पुण्यात
यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे यांची युती झाली आहे, तर शिवसेनेने काँग्रेससोबत आघाडी केली आहे. मनसेचे ४४ उमेदवार रिंगणात असून, त्यांच्या प्रचारासाठी आज अखेरच्या दिवशी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे पुण्यात येणार आहेत. उमेदवारांच्या प्रभागात जाऊन मतदारांची भेट घेणार आहे.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel




1 thought on “Pune : प्रचाराची रणधुमाळी आज थांबणार! शेवटच्या दिवशी कोण गाजवणार? कोणत्या नेत्याची कुठे सभा?”