Baramati : बारामतीचं राजकारण वेगळंच! नवनिर्वाचित नगरसेविकेची थेट हत्तीवरून भव्य मिरवणूक, शहरात चर्चेला उधाण

Baramati : ती सर्वोच्च न्यायालयात वकिली करते. ती उच्चशिक्षित आहे. तिला आपल्या प्रश्नांची जाणीव आहे. ती अधिक आक्रमकपणे आपले प्रश्न सोडवू शकते. कदाचित हा समज अधिक प्रभावीपणे जनतेच्या मनात ठसला तर काय घडू शकतं हे बारामतीतील राजकारणातून दिसून आलं आहे. बारामतीकरांनी सर्वात तरुण नगरसेविकेला निवडून दिलं आहे. तिचं नाव आहे, संघमित्रा काळुराम चौधरी! जिची आज हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली.

बारामतीचे राजकारणच वेगळं! कोणी काही सांगत असेल, पण प्रत्येक वेळी बारामतीचे राजकारण वेगळं पाहायला मिळतं आणि ते अशा पद्धतीने की, लोकसभेच्या निवडणुकीत प्रचंड मताधिक्य देणाऱ्या सुप्रिया सुळे यांच्या पक्षाला नगरपालिकेत मात्र ठेंगा मिळाला! तर दुसरीकडे लोकसभेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागलेल्या अजित पवारांना विधानसभेत मात्र लोकांनी भरभरून मतदान केलं. विधानसभेतला हाच आत्मविश्वास घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्या जागा निवडून आणून अशा अविर्भावात होता. तिथे मात्र मतदारांनी दणका दिला.

Mumbai–Pune Expressway : लोणावळ्यात मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर भीषण कोंडी; ताम्हिणी घाटातही वाहनांच्या लांबच लांब रांगा

मतदारांना गृहीत धरून चालाल तर खबरदार! हाच संदेश देत बारामतीकरांनी वेगवेगळ्या प्रभागात वेगवेगळ्या पद्धतीने मताचे दान दिले. विकास हवा आहे त्यासाठी नेतृत्व तुमचे चालेल. पण आमचा लोकप्रतिनिधी निवडताना तो आमच्या पद्धतीने निवडू, असाच संदेश मतदारांनी दिला आणि तब्बल सहा जण निवडून आले. त्यामध्येच एक होती बहुजन समाज पक्षाची संघमित्रा काळुराम चौधरी ही तरुण नगरसेविका!

संघमित्राच्या विजयाने संपूर्ण राज्यात संविधान किती महत्त्वाचे आणि एक एक मत आणि त्याचा अधिकार किती महत्त्वाचा हे देखील दाखवून दिले आहे. पैशांच्या थैलीच्या थैली आणि पैशांची रास ओतून निवडणुका जिंकल्या जात आहेत, असे भासवले जात आहे. त्या राज्यात एका सामान्य घरातील चळवळीचा कार्यकर्ता असलेल्या बापाचे नाव उज्ज्वल करत संघमित्रा जिंकली आहे. संघमित्राचे हे यश संपूर्ण राज्यात सध्या चर्चेत आहे. आज जेव्हा संघमित्राची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली तेव्हा जणू आपल्या लेकीची मिरवणूक आहे, असे समजून बारामतीकर रस्त्यावर उतरले आणि तिचं कौतुक करू लागले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *