Pune Traffic Update : शिवणे–नांदेड पूल मार्ग शनिवारी रात्री वाहतुकीसाठी बंद; महावितरणच्या भूमिगत विद्युत वाहिनीचे काम

Pune : शिवणे परिसरातील महावितरणतर्फे नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात येत असून, यासाठी मारुती मंदिर, शिवणे ते नांदेड पूल हा रस्ता शनिवार रात्रीपासून रविवारी पहाटेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना शिवणे येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता यांनी सांगितले की, शिवणे, वारजे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे, गावातील वीजपुरवठा परिस्थिती सुधारण्यासाठी नवीन विद्युत वाहिनी टाकण्याचे काम नियोजित करण्यात आले आहे. यासाठी शनिवार, १३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजेपासून ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत काम करण्यात येणार आहे.

Kalyan : धक्कादायक! किरकोळ वादातून गरोदर महिलेवर निर्दयी मारहाण; पोटावर लाथ बसून गर्भातील बाळाचा मृत्यू

मारुती मंदिर, शिवणे ते नांदेड पूल या मार्गावर काँक्रीट रस्ता खोदून भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम होणार असल्यामुळे या काळात संपूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येईल. रस्ता अरुंद असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कामाच्या दोन्ही बाजूंना बॅरिगेट्स लावण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी तसेच नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कामादरम्यान नागरिकांना संभवणारी असुविधा टाळण्यासाठी ही आगाऊ सूचना देण्यात आली असून, शिवणे, वारजे, कोंढवे-धावडे, उत्तमनगर, न्यू कोपरे, नांदेड, खडकवासला, धायरी, किरकटवाडी परिसरातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असेही महावितरणतर्फे सांगण्यात आले. महावितरणने काम सुरळीत पार पाडण्यासाठी आणि परिसरातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *