
Pune : डिसेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पटापट निविदा मंजूर करून घेण्याची धडपड सुरु झाली आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सुमारे ४०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यामध्ये कचरा वाहतुकीसाठी पाच वर्षासाठी ३४० घंटागाड्या घेतल्या जाणार असून, त्यासाठी तब्बल २८० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे.
पुणे महापालिकेची निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यानंतर होईल असे यापूर्वी सांगितले जात होते. त्यामुळे या निवडणुका या जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होतील असा अंदाज वर्तविला जात होता.
|
|
मात्र, आता गेल्या चारपाच दिवसांपासून नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषदेऐवजी महापालिकांच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याची चर्चा राजकीय कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहेच, पण त्याचे संकेतही प्रशासनाकडून दिले जात आहेत. पुण्यासह राज्यातील २९ महापालिकांची निवडणुकीची आचारसंहिता ही डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात लागू शकते असे सांगितले जात आहे.
आचारसंहिता लागण्याच्या धास्तीने महापालिकेतील विविध विभागांनी त्यांच्याकडील कामाच्या फाइल वेगात फिरविण्यास सुरुवात केली आहे. राजकीय कार्यकर्त्यांसह ठेकेदारांकडूनही फाईलचा पाठपुरावा सुरु झालेला आहे.
आज महापालिकेची स्थायी समितीची बैठक आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम यांनी बैठक घेतली. यावेळी आयत्यावेळी सुमारे ५० प्रस्ताव दाखल करण्यात आले. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा विभाग, पथ विभाग, भवन रचना विभाग, उद्यान विभाग आदी विभागातील कामांचा समावेश आहे. या विभागांचे सुमारे ४०० कोटीच्या कामांना आज आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
पुणे शहरात कचरा वाहतूक करण्यासाठी घंटागाड्यांची संख्या अपुरी असल्याने कचरा संकलनाला उशीर लागत आहे. रस्त्यावर कचरा साठून ठेवावा लागत असल्याने अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने घंटागाड्या भाडे तत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३४० घटांगाड्यांसाठी २८० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
कात्रज सर्प उद्यानात सुधारणा करण्यासाठी ४८ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. तर शेवाळवाडी येथील पाणी पुरवठा प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ होणार असून, त्याच्या ३५ कोटीच्या निविदेला मंजुरी दिली आहे. त्याच प्रमाणे रस्ते दुरुस्ती, रस्ते रिसरफेसिंग, रंगरंगोटी, चेंबर दुरुस्ती अशा देखभाल दुरुस्तीच्या सुमारे १० कोटीच्या कामाला मंजुरी दिली आहे. झाडणकामाच्याही निविदा आज मंजूर करण्यात आल्या आहेत.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

