
Pune Nashik Railway : पुणे आणि नाशिक या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या शहरांमध्ये रेल्वे प्रवास लवकरच सोपा आणि जलद होणार आहे. केंद्र सरकारने या मार्गासाठी भव्य मास्टर प्लानला मंजुरी दिली आहे. नवीन हाय-स्पीड आणि सेमी-हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पामुळे अंतर केवळ २ ते अडीच तासांत पार होईल. सध्या रोडने ५-६ तास लागणारा प्रवास आता आरामदायी आणि वेळेची बचत करणारा होईल. पुणे-नाशिक महामार्गावरील प्रचंड वाहतूककोंडीतून सुटका मिळेल. प्रवासी, व्यावसायिकांना आणि पर्यटकांना या मार्गाचा मोठा फायदा मिळणार आहे. हा रेल्वे प्रकल्प केवळ वेळ वाचवणार नाही, तर दोन्ही शहरांमधील आर्थिक व सामाजिक जोडणी अधिक बळकट करेल. अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत माहिती दिली. जाणून घेऊयात हा प्रोजेक्ट नेमका आहे तरी काय?
लोकसभेत नाशिक–पुणे हाय-स्पीड प्रकल्पासंदर्भात करण्यात आलेल्या सूचनांवर वैष्णव यांनी उत्तर दिले. महाराष्ट्र सरकार, स्थानिक प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञ यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यानंतर रेल्वे विभागाने जीएमआरटी क्षेत्र टाळणारी पर्यायी मार्गरचना प्रस्तावित केली आहे. या मार्गामुळे या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक केंद्राचे संरक्षण सुनिश्चित झाले. त्याशिवाय या भागातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकासालाही चालना मिळते.
|
Pune : वाढत्या थंडीचा फटका; शाळांच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा |
कसा असेल नवीन रेल्वे मार्ग -
नाशिक → साईनगर शिर्डी → पुणतांबा → निंबलक → अहिल्यानगर → पुणे (चाकण औद्योगिक वसाहतीमार्गे)
नाशिक-पुणे मार्गाचे काम किती झाले?
नाशिक रोड ते साईनगर शिर्डी दरम्यानच्या दुहेरी मार्गाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) ची तयारी पूर्ण झाली आहे.
साईनगर शिर्डी–पुणतांबा (१७ किमी) दुहेरीकरणासाठी रु २४० कोटींची मंजुरी आधीच देण्यात आली आहे.
पुणतांबा–निंबलक (८० किमी) या मार्गाचे दुहेरीकरणाचे आधीच पूर्ण झाले आहे.
निंबलक –अहिल्यानगर (६ किमी) या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.
अहिल्यानगर–पुणे (१३३ किमी) दरम्यान चाकण इंडस्ट्रियल इस्टेटला जोडणाऱ्या नवीन दुहेरी मार्गासाठी रु८,९७० कोटींचा डीपीआर देखील तयार करण्यात आला आहे.
पुणे-नाशिक रेल्वे मार्ग झाल्यास फायदा काय?
तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. नवीन मार्गरचना नाशिक, एक वारसा आणि धार्मिक शहर, देशातील सर्वात प्रमुख तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या साईनगर शिर्डीशी आणि पेशवे राजवटीत मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक शहर पुणेशी जोडला जाईल. शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि पंढरपूर मार्गावरील धार्मिक पर्यटन जोडली जातील. पुण्यातील किल्ले व ऐतिहासिक वारसा स्थळांशी निगडित ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना मिळेल. मार्गिकेजवळील ग्रामीण पर्यटन आणि स्थानिक हस्तकला उद्योगांना चालना मिळेल. पर्यटक, भक्त आणि प्रवासी यांना या सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांदरम्यान अधिक सुरळीत, जलद आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येईल. त्याशिवाय चाकणमध्ये असणाऱ्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. पुणे-नाशिक या कॉरिडॉरमुळे या पट्ट्यात येणाऱ्या विविध उद्योगांना, विशेषतः चाकण औद्योगिक वसाहत, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी उद्योगांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या उत्पादन केंद्राला लक्षणीय फायदा होईल.
कनेक्टिव्हिटीमुळे काय होणार ?
विद्यार्थ्यांच्या गतिशीलतेत वाढ होईल.
शैक्षणिक आणि कौशल्य-विकास सहकार्य अधिक बळकट होईल
ज्ञानाधारित आणि तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांच्या वाढीस चालना मिळेल
संपूर्ण कॉरिडॉरमध्ये संतुलित शहरी विकासाला चालना मिळेल
पुणे–नाशिक मार्ग ही महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा विकासातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. दोन प्रमुख महानगर क्षेत्रांना जोडून, चाकण तसेच इतर औद्योगिक पट्ट्यांनाही याचा फायदा होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे पर्यटन व शैक्षणिक गतिशीलता अधिक बळकट होईल.
शहर
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाराष्ट्र
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!




























Subscribe to my channel




