
Pune : शहरात काही दिवसांपासून थंडीचा कडाका जाणवत आहे. विशेषतः सकाळी किमान तापमानात लक्षणीय घट होत असल्याचे दिसून येते. परिणामी लहान मुलांना थंडीचा कडाका सोसत शाळेत जावे लागते. म्हणून आता शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेत बदल केला आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी-अधिक किमान तापमानाची नोंद होत आहे. परिणामी सकाळी हूडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. सकाळच्या वेळेत जाणवणाऱ्या थंडीमुळे विद्यार्थी गारठून जात आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळेतील बदल केला आहे. मध्यवर्ती भागातील काही शाळांनी नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे. त्यामुळे आता शाळा नियोजित वेळेपासून २० ते ४० मिनिटे उशिराने भरत आहेत. तर, काही शाळा अद्यापही वेळापत्रकात आवश्यक तो बदल करण्याच्या प्रक्रियेत आहेत.
|
|
'अत्यंत थंडीत लहान मुलांना सकाळी उठवणे आणि शाळेत पाठवणे कठीण होत होते. शाळांनी वेळ बदलल्याने मोठा दिलासा मिळाला', अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्य संरक्षणासाठी हे योग्य पाऊल असल्याचे सर्वसाधारण मत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. परिस्थिती आणखी बदलल्यास शाळांच्या वेळेत पुन्हा सुधारणा करण्याबाबत प्रशासन सज्ज असल्याचे शाळांकडून सांगण्यात आले.
थंडीमुळे लहान मुलांना सकाळी शाळेत येताना त्रास होऊ नये, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळेच्या वेळेत थोडासा बदल करण्याचे नियोजन केले आहे. त्याला पालकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सर्वांच्या सहकार्याने हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल.
- प्रीतम जोशी, मुख्याध्यापक, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, शनिवार पेठ
सध्या सकाळच्या वेळेत थंडीचा कडाका वाढला असून, लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. याच काळात शाळेत स्नेहसंमेलन आणि विविध खेळांच्या स्पर्धा सुरू असल्याने विद्यार्थी कोणत्याही उपक्रमापासून वंचित राहू नयेत आणि त्यांची तब्येतही बिघडू नये, यासाठी शाळेच्या वेळेत किरकोळ बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
- प्रसाद लागू, मुख्याध्यापक, माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय
शहर
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
- मुंबई: ओ मुंडे काका, आमचा वडापाव सुरू करा ना; विद्यार्थ्याच्या निरागस मागणीवर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडेंचे प्रेरणादायी उत्तर
महाराष्ट्र
- पुणे: कोट्यवधी रुपये 'सांडपाण्यात'! दर्जाहीन मलवाहिन्या आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे मुळा-मुठा नदीची बिकट अवस्था
- सिंधुदुर्ग: कणकवलीत महिला पोलिस हवालदार स्मिता माने यांचा जंगलात संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांच्या गंभीर आरोपानंतर पोलिस पती सचिन माने अखेर अटकेत!
- पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी महेश सूर्यवंशी यांची एकमुखी निवड! २०२६ ते २०३१ साठी स्वीकारली धुरा
- मुंबई: एफडीए (FDA) मधून तुकाराम मुंढेंची बदली? सोशल मीडियावरील चर्चांवर सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्वतःच केला मोठा खुलासा!
गुन्हा
- बीड: अहिल्यानगर महामार्गावरील कासार ओढ्यात आढळला निर्वस्त्र व दाढी वाढलेल्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; आष्टी परिसरात उडाली खळबळ
- छत्रपती संभाजीनगर: पत्नी गाढ झोपेत असताना डोक्यात लाकडी दांडा घालून केला निर्घृण खून; हत्येनंतर पती थेट पोलीस ठाण्यात जाऊन शरण
- नवी मुंबई: अमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; महिला तस्कराला 'पीट एनडीपीएस'खाली स्थानबद्ध, तर उलवेतील कुख्यात गुंडाच्या टोळीवर 'मोक्का' दाखल
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: सुटकेनंतर ध्रुव राठीचा धक्कादायक खुलासा ;पोलिसांनी माफी मागितली, सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण ते डिटेंशन नव्हे तर अपहरण होतं!
- नवी दिल्ली: राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचा दिल्लीत धडक मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी अन् राजकीय रणकंदन!
- नवी दिल्ली: सीजेपीच्या १० ऑक्टोबरच्या आंदोलनापूर्वी दिल्लीत मोठी नाकेबंदी; आज रात्रीपासून ५७ मेट्रो स्टेशन्स बंद करण्याचे पोलिसांचे निर्देश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!

























Subscribe to my channel




