
Pune : अरुंद रस्ता आणि त्यात अतिक्रमण यामुळे रविदर्शन चौक ते शेवाळेवाडी फाटा तसेच, त्यापुढे कवडीपाट हद्दीपर्यंत सोलापूर महामार्गावर सततच्या वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याकडे वाहतूक पोलिस विभाग आणि महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग यांचे दुर्लक्ष होत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे.
सोलापूरच्या दिशेने सिरम इन्स्टिट्यूट फाटा ते फॉर्च्यून इस्टेटपर्यंत आकाशवाणी केंद्राची कुंपण भिंत आहे. त्यामुळे या ठिकाणी महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. या भिंतीला लागून फळे, टोप्या, गॉगल विक्रेत्यांची वाहने अतिक्रमण करून उभी असतात. वाहनांमधील काही साहित्य मांडून विक्री केली जातात. या ठिकाणी ग्राहक आणि त्यांची वाहने रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे अरुंद असलेला महामार्ग आणखीनच अरुंद होत आहे.
|
Mumbai : सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता; राज्य सरकार आज घेणार महत्वाचा निर्णय |
मत्स्यबीज उत्पादन केंद्राजवळील कुंपण भिंतीशेजारीही हेच चित्र पाहावयास मिळते. त्यापुढे कुमार मेडोज, ऑक्सिजन व्हॅली, रवी गार्डन, रुकारी पंपाशेजारील दोन्ही बाजू ते पुढे शेवाळेवाडी फाटा, त्यापुढे कृषी विद्यालय व ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, त्याही पुढे भापकरमळा फाटा ते थेट कवडीपाट हद्दीपर्यंत अतिक्रमण झाले आहे.
सोलापूरकडून शहराच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरही शेवाळेवाडी बसडेपो व अण्णासाहेब मगर विभागीय बाजार समिती परिसरात पथारी व्यावसायिकांनी बस्तान मांडले आहे. सकाळी व दुपारच्या वेळी या मार्गावर प्रवाशांना कायम वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते; तर दुपारपासून रात्री उशिरापर्यंत शहराकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना या अतिक्रमणाच्या विळख्यातून बाहेर पडताना नाकीनऊ येते. दरम्यान, महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला थेट आयुक्तांनी सूचना देऊनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा दिसून येत नाही. आयुक्तांच्या दौऱ्यात केवळ धावाधाव करणाऱ्या अतिक्रमण विभागाने पुन्हा डोळ्यांवर पडदा ओढून घेतला आहे. पोलिसांची वाहतूक शाखाही स्थितप्रज्ञ अवस्थेत गेली आहे. थेट महामार्गावरील अतिक्रमणांमुळे होणारी वाहतूक कोंडी त्यांच्या दृष्टीस का येत नाही, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




