
Pune : पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमवारी (ता. २४) विमानतळ प्रशासनासोबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
वन विभागाकडून आवश्यक ते उपाय योजिले जात आहेत. ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. धावपट्टीजवळ पूर्वी तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले होते. रविवारी त्यात वाढ झाली आहे.
रविवारी आणखी सात कॅमेरे लावल्याची माहिती आहे. शिवाय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांना ज्या ठिकाणी सुरक्षा भिंतीची पडझड झाली आहे, त्या ठिकाणी आवश्यक ते उपाय योजण्यास सांगितले आहे.
दरम्यान, विमानतळ प्रशासनाने 'ग्राउंड स्टाफ'ची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'टॅक्सी वे'वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकट्याने जाऊ नये, खाली वाकून कामे करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. कामे करताना सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांची मदत घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
|
|
पुणे विमानतळाच्या धावपट्टीजवळ (टॅक्सी वे के ४) तीन वेळा बिबट्या आढळून आला. रात्रीच्या दीड ते दोनच्या सुमारास बिबट्या 'टॅक्सी वे'जवळ येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धावपट्टीजवळ ट्रॅप कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आम्ही बिबट्याचा शोध घेत आहोत. कॅमेऱ्यांची संख्या वाढविल्याने निश्चितच त्याचा फायदा होईल. आवश्यकता असल्यास आणखी उपाययोजना केल्या जातील.
आशिष ठाकूर, मुख्य वन संरक्षक, पुणे प्रदेश
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




