
Pune : बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली शनिवारी पहाटेच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोन प्रवाशांचा म़त्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील सर्व तरुण हे चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून, हा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात रविवारी (2 नोव्हेंबर) मध्यरात्री बंड गार्डनर मेट्रो स्टेशनखाली झाला हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक काळ्या रंगाची पोलो कार ही मेट्रो स्टेशनखालील रस्त्याने पिंपरीच्या दिशेने वेगाने जात होती. त्यावेळी वाहनचालकाचे कार वरील नियंत्रण सुटले, त्यामुळे ती जोरात थेट जाऊन मेट्रो स्टेशनच्या खांबाला आदळली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला असून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
|
|
या दुर्घटनेत यश प्रसाद भंडारी (वय 23, रा. थेरगाव, पिंपरी चिंचवड) ऋत्विक ऊर्फ ओम विनायक भंडारी (वय 23, रा. पिंपरीगाव, पुणे) अशी मृत तरूणांची असून हे दोघे चुलत भाऊ होते.तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव खुशवंत टेकवाणी असे असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच बरोबर मृत तरूणांचे मृतदेहही ससून रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून, वाहन चालक मद्यधूंद अवस्थेत कार चालवत होता का याचा तपास सुरू आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्यामुळे ही दुर्घटना झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्याचबरोबर, अपघाताचे धक्कादायक सीसीटीव्ही फूटेज समोर आले असून, त्यामध्ये कार भरधाव वेगात खांबाला आदळून कारचा चूरा होताना दिसून येत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




