Pune : फुरसुंगी नगरपरिषद निवडणुकीसाठी महापालिकेचे ३५ कर्मचारी नियुक्त

Pune : पुणे महापालिकेतून बाहेर पडून फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांची नगर परिषद स्थापन झाली आहे. तेथील पहिली सार्वत्रिक निवडणूक पुढील काही आठवड्यात पार पडण्यासाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत हे कर्मचारी तेथे पूर्णवेळ काम करणार आहेत.

फुरसुंगी आणि उरुळी देवाची येथे महापालिकेचा कचरा डेपो आहे. तेथे पूर्वी कचरा उघड्यावर टाकला जात असल्याने ग्रामस्थांनी त्याविरोधात मोठे आंदोलन उभारले होते. ही दोन गावे २०१७ मध्ये पुणे महापालिकेत समाविष्ट झाली होती. पण या गावांमधील मोठे गोडाऊन, अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतींना तीन पट कर आला. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची थकबाकी निर्माण झाली. महापालिकेच्या कर प्रणालीला विरोध असल्याने ही दोन्ही गावे पुणे महापालिकेतून वगळण्याचा निर्णय २०२४ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

Pune : रिंग रोड प्रकल्पाला पुन्हा विलंब; 44 गावांतून जाणार पुण्याचा वर्तुळाकार रस्ता

फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद स्थापन झाली असली तरी तेथे अजून भरती प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांची गरज असल्याने त्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यानुसार ३५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंत नगर परिषदेच्या निवडणुकीचे काम करावे.

१ डिसेंबर २०१२ रोजी पुन्हा महापालिकेत मुळ खात्यात रुजू व्हावे असे आदेश अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी काढले आहेत. वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, वाहनचालक, शिपाई, बिगारी या पदावरील ३५ कर्मचारी आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *