
Central Railway Mega Block : मध्य रेल्वेने कर्जत स्थानकावर यार्ड पुनर्रचना आणि आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारणीचे काम हाती घेतले आहे. यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग कामाची आवश्यकता असल्याने २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये विशेषतः १ ऑक्टोबर आणि २ ऑक्टोबर रोजी रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.
या ब्लॉक दरम्यान १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.२० ते संध्याकाळी ५.२० वाजेपर्यंत तर २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत कर्जत परिसरातील गाड्यांची वाहतूक विस्कळीत राहणार आहे. हा ब्लॉक भिवपुरी स्थानक, जांब्रुंग केबिन, ठाकूरवाडी, नागनाथ केबिन ते कर्जत या संपूर्ण विभागात लागू राहणार आहे.
या दोन दिवसांत कर्जत-खोपोली दरम्यान अप आणि डाउन लोकल गाड्यांची सेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे. त्यामुळे खोपोलीकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. तसेच कर्जत-सीएसएमटी लोकल गाड्या काही वेळा नेरळ किंवा अंबरनाथ येथेच थांबवल्या जाणार आहेत. अनेक गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन होणार असून, काही गाड्या नेरळ, अंबरनाथ किंवा ठाणे येथूनच सुरू होतील.
लोकल गाड्यांबरोबरच मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठा बदल करण्यात आला आहे. काही गाड्या जवळपास दीड ते दोन तास विविध स्थानकांवर थांबवाव्या लागणार आहेत. जोधपूर-हडपसर एक्सप्रेस, सीएसएमटी-भुवनेश्वर एक्सप्रेस, सीएसएमटी-हैदराबाद एक्सप्रेस, बिकानेर-यशवंतपूर एक्सप्रेस, तसेच पनवेल-नांदेड एक्सप्रेस यांसारख्या गाड्या भिवंडी, भिवपुरी रोड, नेरळ, वांगणी आणि चौक येथे नियमन करण्यात येणार आहेत. यामुळे काही गाड्या १५ ते २० मिनिटांनी उशिराने धावतील. तसेच चेन्नई एक्सप्रेस आणि मदुरै एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, त्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटणार आहेत.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबरलाही असाच प्रकार होणार असून, काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नेरळ, अंबरनाथ आणि ठाणे येथून गाड्यांचे शॉर्ट ओरिजिनेशन व टर्मिनेशन केले जाणार आहे. त्यामुळे दिवसभर प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कर्जत यार्डचे आधुनिकीकरण ही एक मोठी योजना आहे. जुन्या पद्धतीच्या इंटरलॉकिंग सिस्टीमऐवजी आधुनिक प्रणाली बसवली जात आहे. या कामामुळे भविष्यात रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत, सुरक्षित आणि वेळेवर होईल. ट्रेनची गती वाढेल आणि अपघाताचा धोका कमी होईल. कर्जत हे एक महत्त्वाचे जंक्शन असून, पुणे, खोपोली, लोणावळा आणि मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी हे केंद्रबिंदूचे स्थानक आहे. त्यामुळे या ठिकाणी होणारे बदल दीर्घकालीन दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, या दोन दिवसांमध्ये गाड्यांच्या वेळापत्रकात होणाऱ्या बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे आणि हे देखभाल मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधा उभारणीसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले आहे. दीर्घकाळासाठी प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा लाभ मिळावा यासाठी ही कामे केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे
.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार


























Subscribe to my channel




