
kalyan News : कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात एक मोठी आणि धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या वृत्ताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राजकारणामध्ये एकमेकांचे वैमनस्य, सूड आणि प्रतिस्पर्धेतून अनेकदा संघर्ष होताना आपण पाहिलं आहे. पण आता थेट ४ कोटी रुपयांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
शिवसेना (शिंदे गट) चे कल्याण तालुकाप्रमुख तथा माजी नगरसेवक महेश पाटील यांचा मुलगा आणि उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे नेते वंडार पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध डोंबिवलीच्या विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेश पाटील यांना वंडार पाटील यांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी नुकतंच न्यायालयाने निर्दोष सोडले होते, याच रागातून त्यांनी हा सूडाचा कट रचल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही, तर 'बदल्यात मुलगा' या भूमिकेतून महेश पाटील यांच्या मुलाला संपवण्याचाही कट होता. सध्या याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते वंडार पाटील ,मुजम्मिल बुबेरे (सुपारी घेणारा) अन्य एक अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच या प्रकरणाचा गुन्हा ठाणे क्राईम ब्रँच कडे वर्ग केला आहे. मात्र या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असून अशा प्रकारची कुठली सुपारी आम्ही दिली नाही. वंडार पाटील पुढे म्हणाले, या प्रकरणात निर्दोष सुटका झाली आहे आणि यासाठी हायकोर्टात अपील करू नये यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप केला आहे'
या घटनेमुळे घाबरलेल्या महेश पाटील यांनी पोलिसांकडे मागणी करताना म्हटलं की, काही दिवसांपूर्वी पुण्यात आई-वडिलांच्या रागात मुलाची ज्या पद्धतीने हत्या झाली. त्याच प्रकारे माझ्या मुलाचीही हत्या होऊ शकते. त्यामुळे या आरोपींना त्वरित अटक करावी'. मात्र या प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांनी आपल्यावर लावलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




