
Maharashtra Politics : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अनेक नेते, पदाधिकारी मोठ्यासंख्येने सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. अशामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांची साथ सोडत आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. बाबाजानी दुर्राणी यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. त्यांच्या या पक्ष प्रवेशामुळे परभणीमध्ये शरद पवार गटाची ताकद कमी होत काँग्रेसची ताकद वाढली आहे.
शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. मुंबईतील टिळक भवन या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये पक्ष प्रवेशाच कार्यक्रम पार पडला. काँग्रेस नेते सिद्धार्थ हत्तीआंबिरे आणि बाबाजानी दुर्राणी यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आज बाबाजानी दुर्राणी यांनी त्यांच्या समर्थकांसह आणि पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
माजी राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते सुरेश वरपुडकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता बाबाजानी दुर्राणी यांना काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांना कोणते पद दिले जाणार आहे ते लवकरच समोर येईल. बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे परभणीमध्ये काँग्रेसची ताकद वाढली आहे.
दरम्यान, बाबाजानी दुर्राणी पहिल्यांदा २००४ मध्ये विधानसभेत आमदार झाले होते. त्यानंतर २०१२ आणि २०१८ मध्ये शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेत आमदार केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी अजित पवारांसोबत गेले होते. पण काही काळानंतर ते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सहभागी झाले. त्यानंतर आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




