
Shocking News : तुम्हीसुद्धा नवजात बाळाला गायीचे दूध देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. नवजात बाळासाठी पहिले सहा महिने केवळ आईचे दूधच पोषक आणि सुरक्षित मानले जाते, मात्र या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने पुण्यातील एका बाळाला जीवघेणा त्रास सहन करावा लागला. २५ दिवसाच्या बाळाला गाईचे दूध दिल्याने त्याला गंभीर प्रकारचा जंतुसंसर्ग झाला. बाळाची प्रकृती इतकी नाजूक झाली की त्याला कमला नेहरू रुग्णालयात एक महिना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाला अखेर जीवनदान मिळाले असून, त्याला आता घरी सोडण्यात आले आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरात राहणाऱ्या एका महिलेची काही दिवसांपूर्वी प्रसूती झाली आणि तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. सुरुवातीला आई आणि बाळ दोघांची तब्येत ठणठणीत होती. काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला. मात्र आईचे दूध येत नसल्यामुळे घरच्यांनी बाळाला गाईचे दूध देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच बाळाच्या शरीरात गंभीर इन्फेक्शन झाले. बाळाला १७ जून रोजी कमला नेहरू रुग्णालयात जुलाब आणि अशक्तपणामुळे दाखल करण्यात आले.
एनआयसीयूमध्ये तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना लक्षात आले की बाळाच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे, रक्तदाब घटलेला आहे, मेटॅबोलिक अॅसिडोसिस झाला आहे आणि श्वास घेण्यास त्रास होतो आहे. जन्मावेळी ३.४ किलो वजन असलेले हे बाळ, इन्फेक्शनमुळे केवळ २.८ किलोवर आले होते. डॉक्टरांनी तातडीने बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवले. औषधोपचार सुरू करण्यात आले आणि रक्तदाबासाठी इंजेक्शन दिले गेले.
|
|
बालरोगतज्ञ डॉ. स्मिता सांगडे यांनी सांगितले की, बाळाला नेक्रोटायझिंग एन्टेरोकोलायटिस (NEC) म्हणजेच आतड्यांना सूज आली होती. त्यामुळे पोट फुगले होते आणि आतडे फुटण्याची शक्यता होती. बाळाला दिलेल्या औषधांना सुरूवातीला प्रतिसाद मिळत नव्हता, म्हणून अधिक प्रभावी औषधे वापरण्यात आली. याशिवाय बाळाला पाच वेळा रक्त चढवण्यात आले. आठ दिवस बाळाला अन्न न देता केवळ नसेद्वारे प्रथिनयुक्त अमिनोवेन दिले गेले, ज्यामुळे त्याच्या शरीरावरील सूज कमी होण्यास मदत झाली.
सुमारे दहा दिवस बाळ व्हेंटिलेटर व ऑक्सिजन सपोर्टवर होता. हळूहळू त्याची प्रकृती सुधारू लागली आणि ३६ दिवसांचे होईपर्यंत बाळ दुध पचवू लागले. अखेर २१ दिवसांच्या एनआयसीयू उपचारांनंतर, ४६ दिवसांचे झाल्यावर बाळाला घरी सोडण्यात आले. कमला नेहरू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत बोठे यांनी सांगितले की, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या रुग्णालयात दररोज ८०० ते १००० रुग्ण ओपीडीमध्ये येतात. दररोज २० ते २५ प्रसूती रुग्णालयात होतात आणि अनेक नवजात बाळांना एनआयसीयू सुविधा दिल्या जातात.
नुकत्याच या प्रकरणात गाईचे दूध दिल्याने बाळाला जंतुसंसर्ग झाला होता, परंतु आमच्या डॉक्टरांनी वेळेवर उपचार करून त्याला जीवनदान दिले. दरम्यान या प्रकरणावरून हे सिद्ध झाले की नवजात बाळासाठी पहिल्या सहा महिन्यांत आईचे दूधच सर्वोत्कृष्ट असते. त्याऐवजी दिलेले गाईचे किंवा कोणतेही बाह्य दूध बाळाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे पालकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच बाळाच्या आहारात बदल करावा.
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!



























Subscribe to my channel



