
Ausa (Latur) : मराठवाड्यातला लातूर जिल्हा हा तसा दुष्काळी पट्ट्या म्हणून ओळखला जातो. मात्र याच लातूर जिल्ह्यातला शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळताना पाहायला मिळत आहे. शेतीत प्रयोग करत लातूरच्या मातीत विदेशी फळ असलेल्या ड्रॅगन फ्रूटचे उत्पादन घेतले जात आहे. यातून वर्षाकाठी एकरी साधारण १२ लाख रुपयांपर्यंत उत्पादन शेतकरी घेत आहे.
लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, ऊस, उडीद हे पिके घेतली जातात. लातूर जिल्ह्यातल्या वातावरणाचा विचार केला असता जिल्ह्यातील पारंपारिक पीक म्हणून सोयाबीन पिकाची ओळख आहे. जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतले जाते. मात्र आता लातूर जिल्ह्यातील शेतकरी विदेशी फळ ड्रॅगन फ्रुट या फळबाग शेतीकडे वळला आहे. अर्थात पारंपरिक शेती न करता नवीन प्रयोग करण्याकडे शेतकरी वळल्याचे दिसून येत आहे.
दोन एकर क्षेत्रात लागवड
लातूरच्या औसा तालुक्यातील बोरफळ गावातील शेतकरी तानाजी यादव यांनी मागच्या दोन वर्षापासून दोन एकर क्षेत्रावर ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. सुरुवातीला ड्रॅगन फूड लागवडीसाठी शेतकऱ्यांने चार लाख रुपये एकरी लागवड खर्च केला. यातून त्यांनी पहिल्याच वर्षी ८ लाख रुपये नफा कमावला आहे. ड्रॅगन फूडची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते आहे. हे फळपीक एकदा लागवड केल्यानंतर वीस वर्षाच्या कालावधीपर्यंत फळ देते.
कमी पाण्यावर येणारे पीक
ड्रॅगन फूड या पिकाला पाणी देखील खूप कमी लागत असल्याने लातूर सारख्या कमी पर्जन्यमान असणाऱ्या परिसरात हे उत्तम पीक म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फूड लागवडीसाठी आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने देखील शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला. जिल्हा बँकेकडून देखील ड्रॅगन फूड लागवडीसाठी आर्थिक मदत करण्यात येते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रॅगन फूड शेती हे वरदान ठरते आहे.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती























Subscribe to my channel

