
Pune : माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुण्यातून समोर येत आहे. वडिलोपार्जित मालमत्तेवर ताबा मिळवण्यासाठी भावानं चक्क बहिणीला जबरदस्तीनं मानसिक रूग्णालयात दाखल केलं. नंतर आईला वृद्धाश्रमात ठेवलं. ही धक्कादायक घटना सिंध सोसायटी परिसरात घडली असून, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र इंदूर राय असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबईतील चेंबूर भागात राहत होता. त्याचा वडिलोपार्जित मालमत्तेवर डोळा होता. यासाठी त्यानं आई आणि बहिणीवर अत्याचार केला. वडिलोपार्जित मालमत्तेवर जबरदस्तीनं ताबा मिळवण्यासाठी त्यानं कटकारस्थान रचलं.
बहिणीची मानसिक स्थिती पूर्णपणे स्थिर असतानाही, तिला मानसिक रूग्णालयात नेलं . नंतर बाउन्सर महिलांना आणून त्यानं बहिणीच्या डाव्या हातात इंजेक्शन दिलं. 'रक्त तपासणीसाठी नेतो आहे' असं सांगत त्यानं बहिणीला मेण्टल हॉस्पिटलमध्ये भरती केली. नंतर त्यानं आईची कोणतीही परवानगी न घेता जबरदस्तीनं वृद्धाश्रमात नेलं.
|
|
तिथं त्यानं वृद्ध आईला दाखल केलं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती शेजाऱ्यांना मिळताच त्यांनी तरूणीला मेण्टल हॉस्पिटलमधून मुक्त केलं. बहीण लगेच घरी परतली. मात्र, धर्मेंद्रनं घरात तिला प्रवेश नाकारला. अखेर तिनं थेट चतु:श्रृंगी पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांना याची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज हांडे यांनी तातडीने कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
तसेच चार अनोळखी महिला बाउन्सरविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
शहर
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क
- मुंबई: ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर अखेर आनंदाची बातमी; या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार मेट्रोच्या चाचण्या!
महाराष्ट्र
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!




























Subscribe to my channel




