
Akola Crime :अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अकोला पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू आहे. एमपीडीए कायद्यानुसार शहरातल्या खदान पोलीस स्टेशन हद्दीतील २ कुख्यात गुन्हेगारांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. त्यांना एमपीडीए कायद्याअंतर्गत थेट तुरुंगाची हवा दाखवण्यात आली आहे. दरम्यान, २८ वर्षीय करीम खान उर्फ बबलु अन्वर खान आणि ३३ वर्षीय अक्रम बेग इमाम बेग असे या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
अकोला शहरात वारंवार इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोचवणे, आगळीक करणे, बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थ विक्री करणे, अश्लील कृती करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने, अपमान करणे, धाकदपटशा करणे, असे बरेच गंभीर गुन्हे करीम खान उर्फ बबलु अन्वर खान याच्यावर दाखल आहेत.
|
Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, शहरातील वाहतुकीत मोठे बदल; या मार्गावरून करा प्रवास |
तर कुख्यात गुंड अक्रम बेग इमाम याच्यावर यापूर्वी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे, आगळीक करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, धाकदपटशा करणे, अश्लील शिवीगाळ करणे, बेकायदेशीर रित्या शस्त्र बाळगणे, गैरनिरोध करणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींवर यापूर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई केली गेली होती, परंतु त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता.
अखेर पुन्हा गंभीर दखल घेत दोन्ही कुख्यात गुंड करीम खान उर्फ बबलु अन्वर खान आणि अक्रम बेग इमाम बेग यांच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा म्हणून त्यांना एक वर्षासाठी कारागृहस्थानबद्ध करण्यात आले. अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शंकर शेळके, माजीद पठाण, ज्ञानेश्वर सैरिसे तसेच पोलीस स्टेशन खदान येथील ठाणेदार मनोज केदारे, नितीन मगर, निलेश खंडारे, संजय वानखडे, अमित दुबे यांनी या कारवाईसाठी परिश्रम घेतले. दरम्यान, अकोला पोलिसांच्या या कठोर कारवाईनंतर सराईत गुन्हेगार व गुंडांना या कारवाईचा चांगलाच धसका बसला आहे.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
- महाराष्ट्र: शरद पवार गटाला खिंडार! तीन आजी-माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश!
- गोवा: नरकासूर प्रथेवर मंत्री सुदिन ढवळीकरांची आक्रमक भूमिका; राजकारणातील नरकासूर आधी बाजूला करा!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!




























Subscribe to my channel




