Pune Theft Case : फिरण्यासाठी घराबाहेर पडले, तो आला अन् हातसाफ करून गेला; मेहुण्याचे अडीच लाखांचे दागिने चोरले

 

Pune Theft Case : 'पुणे तिथे काय उणे' ही म्हण काही खोटी नाही. पुण्यात एका व्यक्तीने बायकोच्या भावाला लाखोंचा गंडा घातला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात चक्क दाजी ने मेव्हण्याच्या घराच्या चाव्यांचा गैरवापर करत दागिने लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत फिर्यादीच्या बहिणीच्या नवऱ्याला अटक केली असून २ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय व्यक्तीने त्याच्या घरात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार ७ जुलै रोजी सकाळी ते कामाला गेले असताना त्यांचे कुटुंबातील सर्व जण त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजता सर्व जण घरी परत आले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या घरी चोरी झाली आहे. घरातून २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता.

घरातील एकूण परिस्थिती पाहिली असता घराची माहिती असलेल्या कोणीतरी हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना तपासादरम्यान आला. आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना एक व्यक्ती अश्रफनगर येथे संशयितरित्या थांबला असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याचे नाव रोहेल शेख असून हा फिर्यादी यांच्या बहिणीचा पती निघाला.

आरोपीला घराची माहिती होती. त्यांच्या घरी येत जात असताना त्याने घराच्या कुलूपाच्या चाव्या घेतल्या होता. फिर्यादीचे कुटुंबीय त्यांच्या घरी आले असताना फिर्यादीच्या घरी जाऊन त्याने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडे चोरी केलेले २ लाख ४६ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम सापडली. हा २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला असून संबंधित गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *