
Shaktipeeth Mahamarg : नागपूर- गोवा असा नव्याने होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांना विरोध केला जात आहे. राज्य सरकारकडून महामार्ग करण्यास हिरवा कंदील मिळाला असून यासाठी मोजणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत. मात्र यानंतर या महामार्गाला जोरदार विरोध केला जात असून राज्यातील १२ जिल्ह्यातील शेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरत आहेत. त्यानुसार आज देखील सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, सांगली जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून परभणीत मात्र महामार्गासाठीची मोजणी थांबविण्यात आली आहे.
शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखली, अधिकारी परतले परभणी : परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुरवाडी आणि सोनपेठ तालुक्यातील काही गावांमध्ये आज शासनाकडून मोजणी करण्यात येणार होती. मात्र ही मोजणी शेतकऱ्यांच्या विरोधामुळे न करता अधिकाऱ्यांना परतावे लागले आहे. यानंतर अधिकाऱ्यांचा ताफा इथे आला. ज्यात कृषी विभाग, वनविभाग, भूमी अभिलेख, तहसील, पोलीस आदी विभागाचे अधिकारी मोजणीसाठी आले होते. मात्र शेतकऱ्यांच्या विरोधामुळे त्यांचं काही चाललं नाही शेवटी मोजणी न करताच अधिकाऱ्यांना परतावे लागले आहे.
नांदेड- वसमत महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला नांदेड : शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार मालेगाव येथे नांदेड ते वसमत हा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरला आहे. रास्ता रोको आंदोलनात शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील सहभागी झाले होते. कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यातून हा महामार्ग काढण्याचा निर्णय घेतला. परंतु इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील कोल्हापूर प्रमाणेच आमदार खासदारांच्या घरावर मोर्चे काढले पाहिजे; असे प्रखर मत शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केले.
|
|
सांगली- कोल्हापूर मार्गावर रास्ता रोको सुरू सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करा; या मागणीसाठी सांगलीमध्ये सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. अंकली या ठिकाणी कोल्हापूर मार्गावर रस्ता रोको सुरू झाला आहे. महिलांसह मोठ्या संख्येने शेतकरी व सर्वपक्षीय नेते आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे, अशी भूमिका घेऊन हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शक्तीपीठ महामार्ग बाधित शेती बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत असून सांगली- कोल्हापूर बरोबर रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला
सोलापूर : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात देखील शेतकरी आक्रमक झाले आहेत. यावेळी मोहोळ- पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला आहे. वारीच्या काळात अत्यंत महत्वपूर्ण असलेला श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग शेतकऱ्यांनी रोखल्याने वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. शेतकऱ्यांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा हट्ट का होतोय?, दरम्यान या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहर
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
- पुणे: प्रेयसीच्या आजाराबद्दल समजताच प्रियकराचं धक्कादायक रूप; पुण्यातील तरुणीने संपवले जीवन, चारित्र्यावर संशय घेणाऱ्या नराधम प्रियकराला अटक
महाराष्ट्र
- जालना: सरकारने चर्चेची दारे खुली ठेवलीत, पण मनोज जरांगे पाटलांचा एल्गार; म्हणाले, माघार नाही!
- जळगाव: रक्षाबंधनादिवशी स्टेटस ठेवून भावाने संपवले जीवन, सणाचा आनंद शोकात बदलला
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नाशिक: समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची दहशत; धावत्या वाहनांचे टायर पंक्चर करत छ. संभाजीनगरच्या कुटुंबाला १८ लाखांना लुटले, सिन्नर तालुक्यात खळबळ
गुन्हा
- पुणे: बारामतीत धक्कादायक घटना; तांदूळवाडीत एकाच घरात माय-लेकाचा संशयास्पद मृत्यू
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य: २० ऑगस्ट २०२६ रोजी तुमच्या राशीवर काय असेल ग्रहांची स्थिती? जाणून घ्या सविस्तर!
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- मुंबई: नेपाळमधील महाप्रलय: मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? ठाण्यातील समीर व अपर्णा जोशी यांच्या कुटुंबांची वाढली घालमेल
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!


























Subscribe to my channel


