
Maharashtra : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी आधिवेशनाला आज पासून सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधीमंडळात सादर केल्या. हा निधी प्रामुख्याने राज्यात रस्ते, मेट्रो, सिंचन योजनांसारख्या पायाभूत प्रकल्पांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन व अंमलबजावणी, महात्मा ज्योतीराव फुले आरोग्य योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच दुर्बल, वंचित समाजघटकांच्या विकासासाठी उपयोगात आणण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या पुरवणी मागण्यांपैकी १९ हजार १८३ कोटी ८५ लाख रुपये अनिवार्य तर ३४ हजार ६६१ कोटी ३४ लाख रुपये कार्यक्रमांतर्गत आणि ३ हजार ६६४ कोटी ५२ लाख रुपये केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत. स्थूल पुरवणी मागण्या ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष निव्वळ भार हा ४० हजार ६४४ कोटी ६९ लाख रुपयांचा आहे.
|
School Bus : बुधवारपासून राज्यभरात स्कूल बस बंद, बस मालकांनी पुकारले आंदोलन |
उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या ५७ हजार ५०९ कोटी ७१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांपैकी सर्वाधिक ११ हजार ४२ कोटी ७६ लाख रुपये हे पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार अनुदानांसाठी खर्च होणार आहेत. ३ हजार २२८ कोटी ३८ लाख रुपये हे मेट्रो प्रकल्प, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा यांच्या मुद्रांक शुल्क अधिभार परताव्यापोटीचे आहेत. राष्ट्रीय सहकार विकास निगम (एनसीडीसी) यांच्याकडून महाराष्ट्र शासनामार्फत सहकारी सहकारी साखर कारखान्यांना खेळत्या भागभांडवलासाठी मार्जिन मनी लोनसाठी २ हजार १८२ कोटी ६९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
कोणत्या प्रकल्पासाठी किती रुपयांची तरतूद करण्यात आली ?
आज पासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यामध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार २४० कोटींची तरतूद करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी १ हजार ६०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले . ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी १ हजार ३०० कोटी रुपये प्रस्तावित मांडण्यात आले. रेवस रेड्डी, पुणे रिंग रोड व जालना-नांदेड महामार्गाला १५०० कोटी रुपयांची तरतूद मांडण्यात आली
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर





























Subscribe to my channel




