
Pune : पुण्यातील पुरंदर तालुक्यात होणाऱ्या प्रस्तावीत आतंरराष्ट्रीय विमानतळाला ७ गावातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत आहे. सध्या शासनाकडून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीचं ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, बाधित सातही गावातील शेतकऱ्यांनी या ड्रोन सर्वेक्षणाला विरोध दर्शवला. अधिकाऱ्यांना सर्वेक्षणादरम्यान, वाट अडवल्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले. या अमानुष कारवाईचा शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी जाहीर निषेध केला आहे. तसेच या धक्काबुक्कीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप देखील गावकऱ्यांनी केला आहे. अंजनाबाई कामठे असं या वृद्ध महिलेचं नाव आहे.
|
KDMC च्या हद्दीत ८ बोगस शाळा, सर्वेक्षणांतून धक्कादायक माहिती समोर |
'पोलिसांना आमच्यावर लाठीचार्ज केला आहे. आम्ही अतिरेकी आहोत का? आमच्यावर लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आमच्यावर गुन्हे दाखल केल्याचं' ग्रामस्थांनी म्हटलं आहे. प्रशासनामुळे आमच्या महिलेचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 'याआधी अनेक आंदोलने उपोषणे केली मात्र, प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. आता आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही', अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
पुरंदर विमानतळासाठी चालू असलेल्या ड्रोन सर्वेला देखील स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू आहे. यावेळी काही आंदोलक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांची वाट अडवली. जनावरे आणि बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ड्रोन सर्वेवरून शेतकरी आणि शासन यांच्यात संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं.
स्थानिक शेतकरी ड्रोन सर्वेला विरोध करत असतानाच, आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे अनेक शेतकरी यात रक्तबंबाळ झाले. या अमानुष कारवाईचा शेतकऱ्यांनी आणि स्थानिकांनी जाहीर निषेध केला. विमानतळामुळे बाधित होणाऱ्या गावांमध्ये सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी अधिक आक्रमक होत असून, शेतकऱ्यांनी प्रशासनावर अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
शहर
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: भीमाशंकर येथे श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात; भाविकांसाठी ३८ विशेष बस आणि सुरक्षेसाठी २५० पोलीस कर्मचारी तैनात
- नागपूर: कायदा-सुव्यवस्था महत्त्वाची, ओबीसी संघटनांनी मोर्चा काढू नये; चंद्रशेखर बावनकुळेंचे आवाहन
- मुंबई: बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर ट्रेनची मोठी अपडेट; २४ ऐवजी फक्त १६ तासांत गाठणार नाश्ता-जेवणासह ३,००० रुपयांपर्यंत असणार तिकीट
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये 'पे अँड पार्क' धोरणावरून सोसायटी फेडरेशनमध्येच मतभेद; एकाचा तीव्र विरोध तर दुसऱ्याचा जाहीर पाठिंबा
गुन्हा
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
- कोल्हापूर: वीजचोरीचा मोठा भांडाफोड शिरोळमध्ये स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून ९ लाखांची चोरी; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
- सांगली: "मेस बदलली म्हणून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण; विटा येथील 'गुरुकुल'मधील प्रकाराने खळबळ."
- पुणे: "पहाटे ३ वाजता थरार; गळ्याला कोयता लावून व्यापाऱ्याची कार फोडली अन् रोकड लुटली!"
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली उच्च न्यायालय आणि विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची यंत्रणा सतर्क
- नांदेड: पतीचा जीव वाचवण्यासाठी मानवी ढाल बनणाऱ्या शूर पोलिसासमोर खासदार हरसिमरत कौर बादल नतमस्तक; हल्ल्यात पोलिसाच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक
- नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान मोदींचे देशाला आवाहन; फाळणीच्या वेदनांची आठवण करत 'विकसित भारत'चे लक्ष्य
- नवी दिल्ली: लोकशाही जिवंत ठेवण्याची आपली जबाबदारी आहे; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे महत्त्वपूर्ण निरीक्षण


























Subscribe to my channel




