
Pune : राज्यभरातील कला केंद्रामध्ये सर्रासपणे सुरू असलेले डान्स बार तातडीने बंद करण्याची मागणी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी शुक्रवारी केली. कला केंद्रातील तबला, ढोलकी आणि पायपेटी ही वाद्ये आणि लावणी गायिका यांना वगळून तेथे डीजे वाजवून कला सादर केली जात असल्याने राज्यभरातील दहा हजार कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, ‘शेतकऱ्यांप्रमाणे कलाकारांनीही आत्महत्या करायची का,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या संदर्भात मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सुरेखा पुणेकर यांनी पत्रकार परिषदेत विविध मागण्या केल्या. अखिल महाराष्ट्र लोकनाट्य सांस्कृतिक कलाकार संघटनेचे अध्यक्ष धोंडीराम जावळे, विकास जावळेकर, चंद्रकांत लाखे या वेळी उपस्थित होते. पुणेकर म्हणाल्या, ‘माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यातील डान्स बार बंद केल्यानंतर लावणी कलाकारांना दिलासा मिळाला होता.
|
Solapur : सोलापुरात २८ बेकायदा इमारतींवर हातोडा? बांधकाम परवाना विभागातील अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात |
मात्र, त्यानंतरच्या सरकारने आणि गृहमंत्र्यांनी कडक धोरण न राबविल्यामुळे डान्स बार पुन्हा सुरू झाले आहेत. तबला, ढोलकी आणि पायपेटी ही वाद्ये वाजविणारे वादक आणि लावणी गायिका अशा पारंपरिक पद्धतीने लोककला सादर करण्याच्या अटीवरच कला केंद्रांना परवाना दिला जातो. या गोष्टींनाच हरताळ फासला जात आहे. राज्यात संगीतबारीच्या ८२ पैकी निम्म्याहून अधिक कला केंद्रांमध्ये डीजे सुरू आहेत. त्यामुळे कला केंद्रातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.’
जावळे म्हणाले, ‘पुण्यातील पाचही कला केंद्रांमध्ये डीजे सुरू आहेत. लातूर, अहिल्यानगर, जामखेड, बीड येथेही अशीच परिस्थिती आहे. याबाबत आम्ही वेळोवेळी संबंधित पोलिसांना निवेदन दिले. मात्र, त्यावर ठोस कारवाई होत नाही. याबाबत आम्ही संघटनेच्या वतीने सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन त्यांच्या हे निदर्शनास आणून दिले आहे. आम्हाला सरकारकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे.‘
लोककलेच्या क्षेत्रात नवीन कलाकार घडावेत, यासाठी ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांच्या नावाने प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या आमच्या मागणीला सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ























Subscribe to my channel




