
Vadodara Crash Accused Rakshit Chaurasia: : वडोदरा येथे भरधाव वाहन चालवून तीन वाहनांना धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या रक्षित चौरसियाच्या रक्तात ड्रग्स सापडल्याची माहिती पोलिसांनी दि इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. नार्कोटिक्स रॅपिड टेस्ट किटमार्फत ही चाचणी करण्यात आली होती.
परंतु, गुजरात पोलिसांकडे ड्रग्जची उपस्थिती तपासण्यासाठी उपलब्ध असलेले रॅपिड टेस्ट किट न्यायालयात ग्राह्य धरता येणार नाही आणि ते केवळ ड्रग्जची उपस्थिती दर्शवते, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. वडोदरा पोलिसांनी सांगितले की, चौरसिया हा वेगाने येणाऱ्या फोक्सवॅगन व्हर्टस गाडी चालवत होता आणि त्याने कारलीबाग परिसरात तीन दुचाकींना धडक दिली. यामुळे हेमाली पटेल यांचा मृत्यू झाला आणि १० आणि १२ वर्षांच्या दोन मुलांसह अनेक जण जखमी झाले. जखमी झालेल्या सात जणांपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे, तर तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
|
|
पोलिसांनी सांगितले की त्यांनी चौरसिया, त्याचा सहप्रवासी प्राणशु चौहान आणि अपघातापूर्वी त्याच्यासोबत असलेल्या तिसऱ्या मित्राचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) मध्ये पाठवले आहेत. गुजरातच्या एका एफएसएल तज्ज्ञाने सांगितले की, “अल्कोहोलच्या वापराचे खटले सिद्ध करणे जितके सोपे आहे तितकेच अंमली पदार्थांच्या सेवनाचे खटले सिद्ध करणे सोपे आहे, तरीही ते क्वचितच न्यायालयात पोहोचतात.”
रक्षित चौरासियाचा पूर्वइतिहास
२३ वर्षीय रक्षित चौरसियाला मागच्या महिन्यातच पोलिसांनी उचलला होता, मात्र केवळी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. सयाजीगंज पोलीस ठाण्यात रक्षित आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात एका वकिलाने तक्रार दाखल केली होती.
फतेहगंज परिसरात असलेल्या एका इमारतीमध्ये रक्षित आणि त्याचे मित्र गोंधळ घालत होते. त्यांच्या आवाजाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्याच इमारतीमध्ये कार्यालय असलेल्या एका वकिलाने त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र यानंतर संतापलेल्या रक्षित आणि त्याच्या मित्रांनी उलट वकिलावरच दमबाजी केली. वकिलाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गोंधळ घालणाऱ्या तरूणांना ताब्यात घेतले.रक्षित चौरसिया हा एमएस विद्यापीठातील विधी शाखेचा विद्यार्थी आहे. आता त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला दाखल करण्यात आला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


