
Pune : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले आहे. विशेष सेवेसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह राज्यातील चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे, कारागृह विभागातील उपअधीक्षक सुनील तांबे, सांगली जिल्हा कारागृहातील हवालदार अहमद शमसुद्दीन मनेर, तुळशीराम गोरवे, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हवालदार गणेश गायकवाड, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयातील हवालदार प्रल्हाद कुदळे यांच्यासह राज्यातील ३९ अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
|
Crime case : पुण्याच्या महिला डॉक्टरला गंडवणाऱ्या डॉक्टराला बेड्या, विवाहित असताना दिला गुलिगत धोका |
कोल्हापूर परिक्षेत्रात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश होता. या पाच जिल्ह्यातील गंभीर गुन्हे,तसेच कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याचे काम फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. कोल्हापूर,सातारा, मिरज, विशालगड येथील जातीय तणाव, तसेच आरक्षणविषयक आंदोलनांचा बंदोबस्त फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आला होता. सामाजिक शांतता राखण्यासाठी सातत्याने बैठका, तसेच ग्रामस्थांशी संवाद ठेवल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली नाही. पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात गडचिरोली, चंद्रपूर या भागात त्यांनी काम केले. माओवादी क्षेत्रात त्यांनी केले. नागपूर, जळगाव, सांगली, पुणे, नाशिक शहरात ते नियुक्तीस होते. गंभीर गुन्हे उघडकीस आणणे, तसेच कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचे काम त्यांनी केले. पालखी बंदोबस्ताची आखणी करुन पालखी सोहळा शांततेत पार पाडण्यात आाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून ४५ कोटी रुपायंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुणे शहरात सायबर गुन्हे शाखेत पोलीस उपायुक्त असताना फुलारी सायबर लॅबची स्थापना करण्यात महत्वाची भूमिक बजावली होती.
उपअधीक्षक सुनील तांबे हे सध्या कारागृहातील दक्षता विभागात नियुक्तीस आहेत. तांबे हे १९८९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. ३६ वर्षांच्या सेवेत त्यांना ४०० हून अधिक बक्षिसे मिळाली आहेत. दिवे आगर येथील गणेश मूर्तीच्या दागिने चोरीचा शोध लावल्याबद्दल तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते १० लाख रुपयांचे बक्षीस त्यांच्या पथकाला मिळाले होते. पुणे-सोलापूर महामार्गावर कुरकुंभ मेफेड्रोन प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केला होता. गुन्हे शाखेत सहायक आयुक्तपदी नियुक्तीस असताना तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीत छापा टाकून तीन हजार ६०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले होते. तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचे कौतूक करुन २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
तांबे हे २०१५ मध्ये राज्य दहशतवादी विरोधी पथकात (एटीएस पुणे) नियुक्तीस होते. फरार असलेला माओवादी अरुण भेलके आणि त्याच्या साथीदारांनी एटीएस पथकाने अटक केली होती. छत्रपती संभाजीनगर एटीएस पथकात नियुक्तीस असताना त्यांनी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या १७ जणांना अटक केली होती. या प्रकरणात १७ जणांना अटक करण्यात आली होती. पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेतील तत्कालिन सहायक आयुक्त सुनील तांबे आणि पथकाने केला होता. कुरकुंभ औद्योगिक वसाहत मेफेड्रोन प्रकरण, अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण, गुंड शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास तांबे आणि त्यांच्या पथकाने केला होता. त्यांनी सातारा, पुणे ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर, पुणे शहर, मुंबईत काम केले होते. मितभाषी स्वभावााचे तांबे यांचा जनसंपर्क दांडगा आहे.
कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातील अतिरिक्त अधीक्षक विवेक झेंडे, कारागृह विभागातील उपअधीक्षक सुनील तांबे, सांगली जिल्हा कारागृहातील हवालदार अहमद शमसुद्दीन मनेर, तुळशीराम गोरवे, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हवालदार गणेश गायकवाड, दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयातील हवालदार प्रल्हाद कुदळे गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
शहर
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- महिला T20 विश्वचषक: भारत उपांत्य फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
महाराष्ट्र
- पुणेकरांचे हाल! नवीन कात्रज बोगद्यात कंटेनर बंद पडल्याने ५ किलोमीटरची वाहतूक कोंडी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा.
- चिपळूण हादरले! वाशिष्ठी नदीपात्रात आढळला मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह; नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ.
- सुपने (कराड) येथे बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने बचावला जीव!
- पुण्याच्या 'सारथी' कार्यक्रमात खुर्चीवरून राडा! पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी आमनेसामने; मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या!
गुन्हा
- "हा क्रिमिनल आहे... आम्ही त्याची वरात काढतोय"; खून प्रकरणातील फरार आरोपीची पुणे पोलिसांकडून धिंड!
- नाशिक: दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा काढला काटा, देवळाली परिसरात खळबळ.
- मुंबई: कारमध्ये बसताच मागचा दरवाजा उघडून चाकूचा धाक, आईच्या धैर्याने लुटारूला केले जेरबंद!
- मुंबई: लोकलमध्ये दरवाजा बंद करण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या!
राजकीय
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
- 'ऑपरेशन टायगर'ची इनसाईड स्टोरी! एकनाथ शिंदेंनी कसा घडवून आणला उद्धव ठाकरेंच्या खासदारांमध्ये ऐतिहासिक भूकंप?
इतर
- २६ जून २०२६:: या राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा, जाणून घ्या तुमचे नशीब!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
- आजचे राशिभविष्य (२१ जून २०२६): या राशींवर बरसणार नशिबाची कृपा; करिअर आणि नोकरीत मिळणार मोठे यश!
- आजचे राशीभविष्य २० जून २०२६: शनिदेव आणि हनुमानजींची कृपादृष्टी; या राशींचे नशीब फळफळणार!
मनोरंजन
- लॉक अप २ चा धमाका! रितेश देशमुख आणि फराह खान करणार होस्ट; जाणून घ्या संभाव्य स्पर्धकांची यादी
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ॲपल उत्पादनांच्या किमतीत मोठी वाढ; इलॉन मस्क यांनाही बसला धक्का, म्हणाले- "मी पाहिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ!"
- 'ऑपरेशन सिंदूर'च्या वीरांना मानाचा मुजरा; ६ जवानांची नावे अखेर जाहीर; राष्ट्रीय युद्ध स्मारकात कोरले जाणार नाव!
- राजस्थान: 'गोल्डन ऑवर' म्हणजे काय? सायबर फसवणूक झाल्यास एक चूक पडेल महागात, त्वरित करा हे काम.
- वाहनचालकांसाठी मोठा झटका! आता लोकअदालतीत जाण्यापूर्वी ५०% दंड भरणे अनिवार्य; नवीन नियमांमुळे बेशिस्त चालकांवर वचक!


























Subscribe to my channel




