
Pune : विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्ह्याला चार मंत्रिपदे देण्यात आली आहेत. पुण्याला ४६ वर्षानंतर माधुरी मिसाळ यांच्या रूपाने महिला मंत्री मिळाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवारांचा सत्तेतील प्रभाव ओसरू लागल्यानंतर पहिल्यांदाच पुणे शहरातील लोकप्रतिनिधींचा राज्याच्या राजकारणातील दबदबा वाढू लागल्याचे प्रतिबिंब यंदाच्या मंत्रिमंडळात उमटले आहे.
विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात २१ पैकी १८ विधानसभा मतदारसंघात महायुतीने महाविकास आघाडीला धूळ चारली. शहरातही आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत महायुतीने निर्विवाद विजय मिळविला. निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शपथ घेतली. त्यानंतर ‘फडणवीस ३.०’ सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे शहरातून कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कॅबिनेट, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तर जिल्ह्यातून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले.
केंद्रातही मंत्रिपद
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री आहेत, तर आमदार चंद्रकांत पाटील हे कॅबिनेट आणि आमदार माधुरी मिसाळ या राज्यमंत्री आहेत. यापूर्वी, १९९५ मध्ये युती सरकारच्या कार्यकाळात शिवसेनेचे शशिकांत सुतार आणि भाजपचे दिलीप कांबळे यांच्या रूपाने शहराकडे दोन मंत्रिपदे होती. २००४ मध्ये कँटोन्मेंटचे आमदार बाळासाहेब शिवरकर यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्रिपद व बोपोडीचे आमदार चंद्रकांत छाजेड यांनी पर्यटन राज्यमंत्रिपद भूषवले, तर २००९ मध्ये काँग्रेसचे आमदार रमेश बागवे यांनी गृहराज्यमंत्रिपद भूषविले.
|
|
सन २०१४ मध्ये कसब्याचे आमदार गिरीश बापट यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम केले, तर दिलीप कांबळे हे सामाजिक न्याय राज्यमंत्री होते. सन २०१९ नंतर उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये पुण्याला मंत्रिपद मिळाले नव्हते. त्याची भरपाई 'फडणवीस ३.०' सरकारमध्ये झाली आहे. औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तिघांपैकी एकालाही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
सन १९९९ ते २००४ या पंचवार्षिकमध्ये खेडचे आमदार रामकृष्ण मोरे यांनी काही काळ शालेय शिक्षणमंत्री पद भूषविले होते. त्यांच्यानंतर पुण्याची 'सिस्टर सिटी' असलेल्या पिंपरी-चिंचवडच्या एकाही आमदाराची मंत्रिपदावर वर्णी लागलेली नाही. पुणे जिल्ह्याला प्रथमच मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले असून, पुणे जिल्हा हा केंद्रासह राज्याच्या राजकारणात 'हेविवेट' जिल्हा ठरला आहे. महायुतीने मंत्रिमंडळात पुणे शहर व जिल्ह्याला झुकते माप देऊन आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे.
जिल्ह्याला प्रथमच पाच मंत्री
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेटमंत्री चंद्रकांत पाटील व दत्तात्रेय भरणे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या रूपाने पुणे जिल्ह्याला प्रथमच पाच मंत्रिपदे मिळाली असून, पुणे जिल्हा हा केंद्रासह राज्याच्या राजकारणात ‘हेवीवेट’ जिल्हा ठरला आहे. महायुतीने मंत्रिमंडळात पुणे शहर व जिल्ह्याला झुकते माप देऊन आगामी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
शहर
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
- महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठा उलटफेर! पुढील चार आठवडे पावसाचं असमान वितरण आणि तूट राहण्याचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढली!
- आजचे राशिभविष्य २१ ऑगस्ट २०२६: शुक्र देणार पैसा, लक्झरी आणि सुख-समृद्धी; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!
महाराष्ट्र
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
गुन्हा
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!




























Subscribe to my channel



