
Mumbai : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-केवायसी (eKYC) पूर्ण करण्याची मुदत 31 मार्च 2026 रोजी संपली असली, तरी आता ती वाढवून 30 एप्रिल 2026 पर्यंत करण्यात आली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली.
यामुळे अद्याप ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला असून, त्या आता नव्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहेत.
काय आहे ‘लाडकी बहीण’ योजना?
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाते. कमी उत्पन्न असलेल्या (वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत) महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो.
मात्र, या योजनेत काही अपात्र व बोगस लाभार्थ्यांचा समावेश झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सरकारने ई-केवायसी सक्तीचे केले. यामागचा उद्देश म्हणजे केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा.
ई-केवायसीसाठी मुदतवाढ का?
ई-केवायसीसाठी सुरुवातीला 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी, संकेतस्थळातील त्रुटी आणि प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे अनेक महिलांना ई-केवायसी पूर्ण करता आले नाही.
तरीही सुमारे 1 कोटी 70 लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली. परंतु, काही महिलांनी अर्ज करताना चुकीची माहिती भरल्यामुळे त्यांचे 1500 रुपयांचे हप्ते थांबले.
यानंतर तक्रारींचा विचार करून 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ती मुदत संपल्यानंतर आता पुन्हा एकदा 30 एप्रिल 2026 पर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे.
महिलांसाठी महत्त्वाचे आवाहन
ज्या महिलांची ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी नव्या मुदतीत ती तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा, योजनेचा लाभ मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
सरकारकडून ही शेवटची मुदतवाढ मानली जात असून, पात्र लाभार्थ्यांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?






















Subscribe to my channel




