
Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण विभागातील विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात तळ ठोकून बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास या मतदार संघातील मतदानाची गणिते बदलण्याची आणि विद्यमान आमदारांना ही निवडणूक आणखीच जड जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात वंचित बहुजन आघाडीने विविध अठरा पगड जाती-धर्माच्या उमेदवारांना वेळोवेळी संधी दिलेली आहे. यातच वंचित कडून आता रत्नागिरी दक्षिण भागात विधानसभेच्या तिन्ही जागांवर उमेदवार उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या दुसऱ्या उमेदवार यादीत दहा मुस्लीम उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत ३० नवीन उमेदवारांचा समावेश आहे, ज्यात विविध जाती-जमातींच्या लोकांचा समावेश आहे.
|
Pune : विधी महाविद्यालय रस्त्यावर चंदन चोरट्यांकडून पोलिसांवर हल्ला, पोलिसांकडून गोळीबार |
आतापर्यंत वंचितने एकूण ५१ उमेदवारांची नावे जाहीर केलेल्या या यादीत उमेदवारांच्या नावांसह त्यांच्या जातीचाही उल्लेख आहे करण्यात आला आहे. ज्यामुळे सर्वसमावेशक संघटना असल्याचे दिसून येऊ लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण भागात देखील परिवर्तनवादी मतदार मोठ्या संख्येने आहे. दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात सध्या राजापूर लांजातून शिवसेना ठाकरे गटाचे राजन साळवी, चिपळूणमधून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शेखर निकम, तर रत्नागिरीतून शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत असे तीन आमदार आहेत. यातील उदय सामंत हे शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटात सामील झाले. तर शेखर निकम राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात सामील झाले. आमदार राजन साळवी हे ठाकरे गटात कायम आहेत. परंतु या तिन्ही आमदारांविरोधात त्यांच्याच मतदारसंघात नाराजीचा सुर मोठा आहे.
या सर्वांना शह देण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीच्या माध्यमातून आपले मोहरे या विधानसभा निवडणुकीसाठी उतरवणार असल्याची दाट शक्यता आहे. यासाठी जिल्हा कमिटीवरील पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. यात जिल्ह्यात उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच अजूनही कोणी इच्छुक असल्यास येत्या चार दिवसात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महासचिव मुकुंद सावंत यांनी केले आहे. मात्र वंचितने रत्नागिरी दक्षिण मधून उमेदवार उभे केल्यास विद्यमान राजकिय पक्षांतील उमेदवारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदारांना आता या वंचितची देखील धास्ती वाटू लागल्याची चर्चा आहे. तसेच वंचित आघाडीने आपले उमेदवार उभे केल्यास रत्नागिरीतील राजकीय गणिते देखील बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ

























Subscribe to my channel




