Pune : पुण्यातील भोंदू बाबाला बेदम चोप; खेडच्या महिलेची फसवणूक उघड

Pune : अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदू बाबाला पुण्यात चांगलाच धडा शिकवण्यात आला. खेड तालुक्यातील एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त नागरिकांनी त्या भोंदू बाबाला बेदम मारहाण केली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भोंदू बाबा विविध समस्या सोडवण्याचे आमिष दाखवत महिलेला जाळ्यात ओढत होता. आजार, घरगुती अडचणी आणि आर्थिक समस्यांवर तोडगा काढून देण्याचे आश्वासन देत त्याने महिलेची आर्थिक व मानसिक फसवणूक केली.

हा प्रकार उघड झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत त्या भोंदू बाबाला पकडले आणि चोप दिला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, अशा भोंदूगिरीच्या घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *