
Baramati : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी अनपेक्षित घडामोड समोर आली आहे. स्थानिक पातळीवरून एकही अर्ज न येता थेट बाहेरील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींमुळे बारामतीच्या पारंपरिक राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार तसेच राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत.
बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, या तिघांपैकी एकही उमेदवार बारामती मतदारसंघातील नाही. जत तालुक्यातील सतीश कृष्णा कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टीकडून, साताऱ्यातील सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राघू घुटुकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
या अनपेक्षित घडामोडींमुळे बारामतीतील स्थानिक इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रमुख पक्षांचे अधिकृत उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने बारामती पोटनिवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली असून, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत या निर्णयाला एकमुखी पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून दमदार लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या संभाव्य उमेदवारीबाबतही चर्चा रंगू लागली आहे. ते अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवसापर्यंत कोण-कोण उमेदवार मैदानात कायम राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




