
Pune : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत येत असलेला भोसरी एमआयडीसी परिसर ३५०० एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रफळामध्ये सन १९६२ पासून विस्तारलेला आहे. या परिसरामध्ये ४८०० प्लॉटधारक असून बहुउद्देशीय कंपन्यांना सुटे भाग पुरविणारे चार हजारहून अधिक लघुउद्योग आहेत. महापालिका अस्तित्वात आल्यापासून एमआयडीसी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या अंतर्गत वादात कायमच एमआयडीसी परिसर हा दुर्लक्षित राहिल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. उद्योजकांच्या मूलभूत समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून या समस्यांबाबत अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही.
नेमकी समस्या काय?
एमआयडीसी परिसरात २२ ब्लॉक असून या परिसरातील कचरा संकलनासाठी केवळ एकच कचरागाडी विभागून देण्यात आली होती. महापालिकेने कचरा संकलनाचे काम खासगी संस्थेला दिले. याबाबतची निविदा प्रक्रिया राबविताना केवळ रहिवासी भागातील कचरा संकलनाचे नियोजन केले. परंतु, औद्योगिक भागाचा समावेश केला नाही. त्यासाठी कर्मचारी नियुक्त केले नाहीत. परिसरातील कचराकुंड्याही उचलण्यात आल्या. कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाड्याही बंद केल्या. परिणामी, एमआयडीसीमध्ये प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीग झालेले आढळून येतात. कचरा साचल्याने कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कामगारांना डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांसारखे रोग झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये एमआयडीसी परिसरात उद्योजकांना कचरा विकत द्यावा लागतो. भंगारवाले कचरा परिसरामध्ये जाळून त्यातील उपयोगी वस्तू काढून घेतात. कचरा जाळल्याने परिसरामध्ये प्रदूषणही वाढत आहे.
|
Atal Setu: अटल सेतूवर कार थांबवली अन् समुद्रात उडी मारली; घटना CCTV मध्ये कैद |
उद्योजक काय म्हणतात?
गेल्या काही वर्षांपासून भोसरी, एमआयडीसी परिसरात कचऱ्याची समस्या जटील झाली आहे. कंपन्यांमधील कचरा उचलला जात नाही. कचऱ्याचे ढीग कंपन्यांमध्ये साचलेले असतात. कंपनीत दुर्गंधी पसरली आहे. रस्त्यांची नियमितपणे झाडलोट केली जात नाही. सर्वत्र अस्वच्छता आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु, तोडगा काढला जात नसल्याचे पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षांपासून एमआयडीसी परिसरात कचरा विकत द्यावा लागतो ही उद्योजकांची शोकांतिका आहे. भंगार व्यावसायिकांना बोलावून कचरा द्यावा लागतो. या कचऱ्याबरोबर कंपनीतील अनेक किमती सामग्री सुद्धा ट्रकमध्ये चोरीस जाण्याचे प्रकार घडलेले आहेत. उद्योजकांनी कचरा रस्त्यावर टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. पाच ते २५ हजारापर्यंत दंड वसूल केला जातो. त्यामुळे उद्योजकांना गप्प बसून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. स्वतंत्र औद्योगिक महापालिका उभारण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. उद्योजकांना मूलभूत सुविधा न मिळाल्यास एमआयडीसीतील उद्योग परराज्यात स्थलांतरित होतील, अशी भीती फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
प्रशासनाचे म्हणणे काय?
कचरा संकलनाच्या निविदा प्रक्रियेत औद्योगिक भागातील कचरा उचलण्यासाठी मनुष्यबळाचा विचार केला नव्हता. एमआयडीसी परिसरातील कचरा उचलण्यासाठी नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही सुरू आहे. लवकरच नियमित कचरा उचलला जाईल. परिसरात स्वच्छता चालू होईल, असे आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त अजिंक्य येळे यांनी सांगितले.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!



























Subscribe to my channel

